शेतकऱ्यांचा “गोफणी” प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत “खेळ” म्हणून प्रसारित; पहा दुसरी विश्वकप स्पर्धा कधी?
The "slingshot" type of farmer spread internationally as a "sport"; See when the second World Cup?
जंगली पशु-पशुपक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी एक शेतकऱ्याचे, हत्यार असते त्याला “गोफनी” (Sling) असे म्हणतात. बदलत्या काळाबरोबर गोफनी प्रकार कमी होत चालला होता. आता हीच शेतकऱ्यांची गोफनी (Farmers’ sling) खेळ म्हणून सर्वत्र गाजू लागली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने गोफणी खेळाचा प्रसार होत असलेला दिसून येत आहे. हा “गोफनी” खेळ तब्बल 36 देशांपर्यंत पोहचला आहे.
गोफनी खेळाच्या 7 आंतरराष्ट्रीय व एक विश्वकप स्पर्धा झाली आहे तसेच स्पेनमध्ये 14 ते 17 ऑक्टोबर 2021 मध्ये दुसरी विश्वकप स्पर्धा होणार असल्याचे सांगितले आहे. आणि यामध्ये 34 देशांचे संघ सहभागी होणार आहे. सध्या भारतात अमॅच्युअर स्लीगिंग इंडिया फेडरेशन च्या माध्यमातून हा गोफनी खेळ विकसित होत असताना दिसत आहेत. चेंडू व दोरी खेळाचे दोन प्रकार आहेत.
वाचा : शेतकऱ्यांनो घरी बसून 72 तासांच्या आत नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्या; ती कशी? वाचा सविस्तर
गोफनी स्पर्धा कशी असते?
गोफनी खेळ वैयक्तिक किंवा संघाने खेळू शकतो यामध्ये 5 खेळाडूंचा समावेश असतो. या मध्ये दोन गट असतात एक सोळावर्षवरील व दुसरा सोळावर्षाखालील. सोळावर्षाखालील गटात 10 मीटर व लॉंग मध्ये 20 मीटर असा प्रकार आहे. तसेच 16 वर्षावरील 30 मीटरचा प्रकार असतो. या खेळामध्ये वर्तुळाला दगड किंवा चेंडू लागल्यास 2 गुण मिळतात तसेच बोर्ड ला लागल्यास 1 गुण मिळतो. जो खेळात अधिक गुण मिळवेल तो विजेता ठरतो.
पुण्यात गोफनी खेळाचे मुख्यालय आहे. गोफनी ही सुताच्या दोरीपासून तयार केलेली असते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :