कृषी बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ वर्षातील उर्वरित पीक विम्याची 75 टक्के रक्कम वाटपास सुरू

Crop Insurance | खरीप पीक विमा 2021 संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 2021 मध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून शेतकऱ्यांना (Agriculture) पात्र करण्यात आले होते. याचं अनुषंगाने राज्यात 23 जिल्ह्यांत अधिसूचना प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या अधिसूचना जारी केल्यानंतर शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ (Financial) रक्कम वितरीत करण्यात आली होती. यानंतर शेतकऱ्यांना (Agriculture Information) उर्वरित पिक विम्याची प्रतीक्षा होती. हाच उर्वरित पीक विमा (Crop Insurance) वाटप करायला सुरुवात झाली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात

उर्वरित पीक विमा वाटप सुरू
पीक विमा 2021 ची शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यातील 75 टक्के उर्वरित रक्कम (Financial) तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. उदा. शेतकऱ्यांचा किंवा महसूल मंडळाचा 20 हजार रुपये पीक विमा (Crop Insurance Scheme) मंजूर झाला असेल त्यातील 25 टक्के रक्कम म्हणजेच 5 हजार रुपये रक्कम तुमच्या खात्यावर (Account) जमा झाली असेल तर त्यातील उर्वरित 15 हजार रुपये रक्कम आता खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

वाचा: बाप रे! नरेंद्र मोदींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून ‘असा’ केला कट, जाणून घ्या धक्कादायक कारण…

2022 चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात
अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई देखील पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या (Agriculture in Maharashtra) खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक स्थैर्य मिळत आहे. शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी सरकारकडून तब्बल 3 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for farmers! 75 percent of the remaining amount of crop insurance for this year is being distributed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button