ताज्या बातम्या

Fuel Rate | सामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेलसह एलपीजीचेही दर कमी, तर ‘या’ लाभार्थ्यांना अनुदान

देशातील पेट्रोल आणि डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या गगनाला भिडलेल्या किमती कमी करण्यासाठी निर्णय घेतला आहे.

Fuel Rate | शनिवारी (21 मे) केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय उत्पादन शुल्कात (Central excise duty) मोठी कपात जाहीर केली. वाढत्या महागाईविरोधात सरकारने बिगुल वाजवला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) आणि पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कपात (Reduction of petrol and diesel rates) करण्यात आली आहे.

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी नवीन किमती लागू
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल, गॅस) महागाईबद्दल लोकांच्या सरकारकडे बऱ्याच दिवसांपासून तक्रारी होत्या. मात्र, आता सरकारने याप्रकरणी मोठे पाऊल उचलत हा निर्णय घेतला आहे.

वाचा: Rent Agreement | भाडे करार 11 महिन्यांचाच का असतो? जाणून घ्या कारण

उत्पादन शुल्कात कपात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जयपूरमध्ये सांगितले होते की, त्यांना सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करावा लागेल. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरनंतर दुसऱ्यांदा उत्पादन शुल्कात कपात करून वाढत्या महागाईला लगाम घालण्याचे काम त्यांनी केले आहे. साहजिकच या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी होणार स्वस्त
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत.

वाचा: Elderly Care Act | म्हातारपणी मुलं सांभाळत नाहीत? तर काळजी करू नका, कायद्याच्या आधारे मिळवा अधिकार
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार अनुदान
गॅस सिलिंडरच्या दराबाबत बोलायचे झाले तर सर्वसामान्यांना यात मोठा दिलासा मिळाला आहे. 200 रुपये प्रति सिलेंडर कपात करण्यात आली आहे. सरकारने हे 200 रुपये अनुदान म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच घेता येणार आहे. तसेच, वर्षभरात केवळ 12 सिलिंडरसाठी 200 रुपयांची सबसिडी मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button