कृषी बातम्या

हरभऱ्याचा दर कोरोनाच्या काळात ही टिकून पहा किती मिळतोय दर ….!

The rate of gram survives in the time of corona. See how much you get दर.!

अकोला : शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीवर(minimum base price) हरभरा दर पोचलेला होता. वाढत्या कोरोना च्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच ठिकाणी संचार बंदी सह निर्बंध लादले गेले आहेत. अशा काळात सुद्धा हरभऱ्याचे दर कमी झाले नाहीत. या हंगामात सुरुवातीला 5500 चा दर घाटला होता, नंतर ठीकठिकाणी लागलेल्या संचार बंदीमुळे दर जरा खाली आला तो चार नऊशे तर कधी 5000 ( Five thousand) पर्यंत टिकून होता.पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला सहा हजाराच्या वरती दर शेतकऱ्यांना मिळाला आहे.

शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड उत्साहात वाढवली होती कारण परतीचा पाऊस आणि सिंचन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पन्नही चांगले वाढले होते, हरभऱ्याची आवक ही बाजारपेठांमध्ये वाढण्यात सुरुवात झालेली असतानाच कोरोनामुळे बाजार समित्याही बंद कराव्या लागल्या.

हेही वाचा : ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..

शासनाने अशा परिस्थितीतही बाजार समित्या नियमितपणे चालू ठेवलेले आहेत. काही ठिकाणी नियमितपणे खरेदी-विक्रीचे व्यवहार (Buying and selling transactions ) सुरू ठेवलेले आहेत. बाजारातील हरभऱ्याची आवक कमी जास्त होत आहे तरी त्याचे परिणाम दरावर जास्त दिसून येत नाहीयेत. थोडाफार चढ-उतार हा दरांमध्ये दिसत असला तरीही हरभऱ्याचा दर पाच हजाराच्या अवतीभवती रेंगाळत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर लागू असलेले निर्बंध उठवले तर आवक वाढून हरभऱ्याला चांगले दर मिळतील असा विश्वास काही तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. हरभऱ्याच्या दर पाच हजारापर्यंत टिकून राहतील असा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा….
मी E शेतकरी बोलतोय, “सातबारा चा उतारा कसे नाव पडले ठाऊक आहे का?

खुशखबर! मान्सून धडकणार “या” तारखेला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button