महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रमुख कडधान्य पिकांपैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये (Western Maharashtra) हरभरा या पिकाखाली 3.01 लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन 2.52 लाख टन होते. हे राज्याच्या या पिकाखालील क्षेत्र च्या सुमारे 27 टक्के इतके आहे. आता हे पीक केवळ पश्चिम महाराष्ट्रापर्यंतच (Western Maharashtra) मर्यादीत राहिलेले नाही. मराठवाड्यातही हरभऱ्याचे क्षेत्र हे वाढत आहे. आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील काढत आहेत. हरभरा पिकाची पेरणी तसेच काढणीपर्यंत सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
पेरणीची योग्य वेळ
कोरडवाहू क्षेत्रामध्ये 1 ऑक्टोंबरनंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करणे आवश्यक आहे. बागायती क्षेत्रावर ओल टिकून राहते. त्यामुळे हरभरा 20 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास ही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घेता येते.
आंतरमशागत कधी व कशाप्रकारे करावी? पहा
पीक उगवणीपूर्वी तणनाशकाचा वापर करायचा असल्यास पेंडिमिथीलीन 5 लीटर एक हेक्टर क्षेत्राकरिता 5000 लीटर पाण्यामध्ये मिसळून अंकूर जमिनीच्या पृष्ठभागावर येण्याआधी फवारावे. पीकामध्ये तण नसेल तर पिकाचे वाढ ही जोमात होते. त्यामुळे सुरवातीपासूनच शेत हे तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे.
वाचा –
पाण्याचे व्यवस्थापन असे करा..
पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण चांगली होते. 45 ते 50 दिवसांनी दुसरे पाणी आणि आवश्यकता वाटल्यास तिसरे पाणी 65-70 दिवसांनी द्यावे. कोरडेवारे जास्त प्रमाणात असल्यास ओल उडून जाते. त्यामुळे पीकाची पाहणी करून योग्य वेळी पाणी देणे गरजेचे आहे.
किड-रोगराईपासून पीकाचे संरक्षण –
पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात. अशावेळी लिंबोळीच्या 5 टक्के द्रावणाची एक फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे अळीचा बंदोबस्त होतो.
हरभरा पीकाची काढणी –
घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभ-याची काढणी करुन मळणी करावी. यानंतर हरभऱ्याला हे 5-6 दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवताना त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही. पेरणीपासून काढणीपर्यंत योग्य ती काळजी घेतली तर हेक्टरी 25 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.
वाचा –