कृषी बातम्याबाजार भाव

Tur Rate | तूर उत्पादकांची चांदी! बाजारात तुरीचे दर राहणार टिकून, जाणून घ्या किती मिळेल भाव?

Tur Rate | भारतात तुरीच्या डाळीला सर्वाधिक मागणी असते. भारतीय संस्कृतीमध्ये दररोजचे जेवण हे वरण भातानेच पुर्ण होते. याचमुळे भारतात तुरीची लागवड (Tur Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच मागणी पूर्ण करण्यासाठी तुरीची (Department of Agriculture) इतर देशातून आयात देखील केली जाते. त्याचवेळी शेतकऱ्यांना (Agriculture) यंदा तुरीला चांगला दर मिळणार आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुरीचे दर यंदा का वाढू शकतात.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेसाठी तब्बल 104 कोटींचा निधी मंजुर; जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

यंदा तूर उत्पादनात होणारं घट
खर तर, यंदाच्या वर्षी तुरीच्या (Tur Cultivation) पिकाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचा मोठा बसत आहे. याच कारणामुळे तुरीची लागवड (Department of Agriculture) होऊन देखील उत्पादनात घट होऊ शकते. जवळपास यंदा तूर उत्पादनात 20 टक्के इतकी घट होऊ शकते. ज्याचा परिणाम दरावर होऊ शकतो.

आयात वाढूनही तुरीला मिळणार चांगला दर
देशातील उद्योग यावर्षी 27 ते 32 लाख टन तुरीचा अंदाज व्यक्त करत आहे. तर देशात यावर्षी 8 लाख टन होऊ शकते. म्हणजेच देशात एकूण 35 ते 40 टन लाख तुरीचा (Farming) पुरवठा होऊ शकतो. परंतु देशात तुरीची गरज 44 लाख टन इतकी आहे. त्यामुळे तुरीची आयात मोठ्या प्रमाणावर केली जाते.

वाचाऐकावं ते नवलचं! फक्त एका अननसाची किंमत ‘इतके’ लाख, जाणून घ्या कोणती आहे ही महागडी जात

तुरीचे दर राहणार टिकून
मात्र, देशात यंदा मोठ्या प्रमाणात तुरीची आयात केली जाणार आहे. सध्या तुरीच्या आयातीची जोरदार हालचाल सुरू आहे. तर, आफ्रिकेतून तुरीची आयात केली जाणार आहे. तर तुरीचे नवे पीक फ्रेब्रुवरीपासून हाती येणार आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत बाजारात तुरीची मोठी आवक होईल.
परंतु तुरीची मागणी पाहता तुरीची आवक मोठी असून देखील दर मात्र तेजीतच राहू शकतात. याच कारणामुळे यंदा तुरीला चांगला दर मिळू शकतो. यामुळे तूर उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Toor manufacturers silver! The price of turi will remain in the market, know how much you will get?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button