कृषी बातम्या

Soybean Rate | सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर! विक्रीची घाई करू नका आठवड्यातच दरात ‘इतकी’ होणारं वाढ

Soybean Rate | खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे (Farming) मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले तर कधी मालाला चांगला भाव मिळाला नाही. यावर्षीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना सोयाबीनला (Soybean Rate) कमी भाव मिळाल्याने शेतकरी वैतागले आणि त्यांनी सोयाबीन साठवणुकीचा आग्रह धरला. त्याचवेळी राज्यातील काही बाजार समितीत सोयाबीनच्या दरात (Soybean Market) चढ उतार दिसून येत आहे. अशातच सोयाबीन उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

वाचा:खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशक

दर नरमल्याने शेतकरी चिंतेत
बाजारातील सोयाबीन दर काहीसे नरमले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. केंद्राने डीओसी व पामतेल आयात करण्याचे धोरण लागू केल्यामुळे त्याचा देशांतर्गत सोयाबीन (Soybean Market) बाजारावर विपरीत परिणाम झालाय. यंदा देशांतील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) कमी असल्यामुळे भाव वाढण्याचा अंदाज होता. मात्र, चित्र उलट दिसत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले जबरदस्त निर्णय! थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात होणार वाढ

सोयाबीनच्या दरात होणार वाढ
आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Type of Agriculture) मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आठवड्याभरात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) सोयाबीन विक्रीची घाई करू नये आणि या दरवाढीचा फायदा घेत विक्री करावी. तर या आठवड्याभरात सोयाबीनच्या दरात शंभर रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी (Agriculture) दरावर लक्ष ठेवूनच सोयाबीनची विक्री करावी.

वाचा: ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

सध्या किती मिळतोय दर?
बाजारात सोयाबीनची आवक वाढताच दर थेट 15 टक्क्यांनी घसरले. तर सोयाबीनला 4 हजार 300 रुपये हमीभाव आहे. गेल्या आठवड्यात इंदूर मार्केटमध्ये सोयाबीनचे दर 5 हजार 698 रुपयांवरून 5 हजार 534 रुपयांवर घसरले. अकोला मार्केटमध्ये सोयाबीन 5 हजार 858 वरून 5 हजार 618 रुपयांवर घसरले. काही मार्केटमध्ये दर 5 हजार 400 रुपयांवर घसरले होते. तर आता 100 रुपयांची दरात वाढ होणार आहे. सध्या शेतकरी कशाप्रकारे बाजारात सोयाबीनची विक्री करतात यावर दर टिकून आहेत असे जाणकारांचे मत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for soybean growers! Don’t be in a hurry to sell, the price will increase by ‘so much’ within a week

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button