‘ऑपरेशन ग्रीन’ अनुदान योजनेतून 1 कोटी रुपयांचे अनुदान मिळू शकते; लवकर नोंदणी करा, राहिलेत फक्त 5 दिवस..
शेतमालाला आणखी बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) वाहतूक आणि साठवणुकीसाठी ऑपरेशन ग्रीन (Operation Green) अनुदान योजना आणलेली आहे. केंद्र सरकारने (Central Government) म्हंटले आहे या योजनेचा जो कोणी लाभार्थी असेल त्या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त १ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून योजनेंतर्गत टोमॅटो, कांदा व बटाटा पिकांसह इतर फळे व भाजीपाला पिकांच्या एकात्मिक मूल्य साखळी विकास योजना आखली आहे. यासाठी ५०० कोटींची निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त ५ दिवस बाकी राहिलेले आहेत. याविषयी आपण सविस्तर माहिती घेवूया..
वाचा –
ऑनलाईन नोंदणी आवश्यक –
शेतकरी (Farmer), कृषी पणन, फेडरेशन संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था ,कंपन्या, प्रक्रियादार ,सेवा पुरवठादार निर्यातदार आणि कमिशन एजंट आधी प्रस्ताव ऑनलाइन नोंदणीसाठी केंद्र शासनाच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या www.sampada-mofpi. gov.in/Login. aspx या वेबसाईटला भेट द्यावी. लाभार्थ्याने प्रथम ऑनलाइन पोर्टल वर नोंदणी करावी. प्रत्येक लाभार्थ्याला योजना कालावधीमध्ये कमाल एक कोटी रुपयांपर्यंत लाभ घेता येईल. सदर योजनेचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर पर्यंत आहे.
वाचा –
या पिकांसाठी योजना –
ऑपरेशन ग्रीन (Operation Green) योजनेअंतर्गत कृषी मालाच्या उत्पादन क्षेत्रापासून ग्राहक बाजारपेठेपर्यंत वाहत होता आणि साठवणुकीसाठी प्रत्येकी 50 टक्के अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंबा, केळी, पेरू, किवी, लीची, पपई, लिंबू, अननस, डाळिंब, फणस, तसेच घेवडा, कारले, वांगी, ढोबळी मिरची, गाजर, फ्लॉवर, हिरवी मिरची ,भेंडी, कांदा, बटाटा आणि टोमॅटो ताजी फळे व भाजीपाला यांचा समावेश केलेला आहे.
कोण घेऊ शकेल लाभ ?
राज्यातील वैयक्तिक शेतकरी कृषी (Farmer Agriculture) पणन फेडरेशन संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, कंपन्या, प्रक्रियादार, सेवा पुरवठादार, निर्यातदार आणि कमिशन एजंट इत्यादी लाभार्थी योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
अनुदानासाठी निश्चित करण्यात आलेले वाहतूक भाडे
ट्रक २ रुपये 84 पैसे प्रति टन प्रति किलोमीटर, शीत वाहन पाच रुपये प्रति टन प्रति किलोमीटर अनुदानासाठी निश्चित करण्यात आले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा