मान्सून पाऊस सुरू झाला आहे ; पावसाळ्यामध्ये ‘जीवितहानी’ टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?
The monsoon rains have begun; How to take care to avoid 'loss of life' in the rainy season?
मुंबईसह (Including Mumbai) अनेक जिल्ह्यामध्ये मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे, कोकण किनारपट्टी सह रत्नागिरी,ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा (Extremely vigilant) इशारा देण्यात आला आहे. पुढली पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून (From the weather department) वर्तवण्यात आली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे,राज्यात बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. अशा वेळेस मेघगर्जनेसह (With thunder) पाऊस झाल्यास कोणती काळजी घ्यावी ते आपण पाहणार आहोत.
हेही वाचा : पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख पटकन जाणून घ्या; पॅनकार्ड आणि आधार कार्ड कसे जोडाल…
पावसाळ्याच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी वीज पडून मनुष्यहानी होते, यासाठी बचाव आणि सुरक्षा (Rescue and security) आणि गोष्टींचे पथ्य पाळले तर अशा घटना टाळता येऊ शकतात.
बऱ्याच वेळा पाऊस जोरदार पडत असल्याने, पावसापासून बचाव होण्याकरिता झाडाचा आसरा घेतात परंतु वीज नेमकी झाडावर पडते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
विजा चमकत असल्यास घराचे दारे,खिडक्या बंद करून ठेवावे, तसेच घरापासून कुंपण देखील लांब अंतरावर असावे.
मेघगर्जना चालू झाल्यास, घरांमध्ये कमीत कमी 30 मिनिटे आत मध्ये रहावे, शकतो बाहेर जाणे टाळावे.
कदाचीत आपण बाहेर असाल तर, झाडाखाली न थांबता मजबूत इमारतीच्या दिशेने पळ काढावा.
मेघगर्जनेच्या वेळी ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहावे.
गाडी ट्रॅक्टर चालवत असलेल्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा.
उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा.
हेही वाचा : ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ या योजनेचा पशुपालकांना कसा उपयोग होईल, जाणून घ्या ; संपूर्ण माहिती…
जोरदार पाऊस चालू झाल्यास घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन मोबाईल, इलेक्ट्रिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. तसेच कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये जसे की इस्त्री, मोबाईल
उंच जागांवर, टेकडीवर ,मोकळ्या जागेवर, समुद्रकिनारी, स्वतंत्र झाड, रेल्वे, बस, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी गोष्टी पासून दूर रहावे.
लटक्या तारा किंवा विद्युत खांब यापासून देखील दुरावे व सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा.
वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. त्याला हात लावण्यास धोका नाही.
श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलाही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाच्या हृदयाची गती सीपीआर करून सुरू ठेवावी.
हेही वाचा :
1)किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!
2)विक्रमी धान्योत्पादन! देशावरचे संकट शेतकऱ्यांच्या मनगटाने तारल …