ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | अर्रर्र! देशात मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता, पावसाबाबत हवामान विभागाचा चुकणार अंदाज?

देशात एकीकडे कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे नागरिक (Citizen) पावसाची (Rain) आस लावून बसले आहेत.

Weather | हवामान विभागाने देशात यावर्षी लवकर मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. जो आता चुकीचा ठरणार आहे. तर 27 मे पर्यंत मान्सून (Monsoon) भारतात (India) दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज (Meteorological Department Forecast) चुकण्याची शक्यता आहे. यंदा भारतामध्ये मान्सूनचे आगमन हे उशिराच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांची शेतीचे (Agriculture) कामे देखील खोळंबून नियोजन लांबणीवर जाणार आहे.

वाचा: Weather | महाराष्ट्रात धडकणार मोसमी वारे? येत्या चार दिवसात ‘या’ भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

दरम्यान, आज मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. ही पावसाची रिमझिम पावसाळ्या पूर्वीचा अवकाळी पाऊस असून चालू मान्सून हा गेल्या तीन दिवसापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीवर बरसत आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये केरळात आणि त्यानंतर कोकण मार्गे महाराष्ट्र आणि मुंबईसह इतर राज्यांमध्ये बरसणार आहे.

वाचा: Asani Cyclone | असानी वादळाच्या प्रभावामुळे राज्यातील ‘या’ भागांत ढगाळ वातावरण

तसेच, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाचा पाऊस हा सकारात्मक राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना काही आठवड्यामध्ये दिलासा मिळणार आहे. तसेच, हवामानातील बदलांमुळे काही ठिकाणीं हलक्या सरी बरसण्याच्या शक्यता आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button