येत्या चोवीस तासांमध्ये या प्रदेशात पडेल मुसळधार पाऊस हवामान खात्याने वर्तविला अंदाज
The meteorological department has forecast torrential rains in the region in the next 24 hours
⛈️येत्या चोवीस तासांमध्ये देशांमधील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे. काश्मीर आणि लडाख येथे शुक्रवारी वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीसह 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि तेलंगणात एक-दोन ठिकाणी गारपीट होऊ शकते. असा अंदाज हि हवामान खात्याने वर्तवला आहे.
🌧️अशावेळी ज्या शेतकऱ्यांनी कापणी केली आहे त्यांनी त्यांनी सुरक्षितपणे पिकाची साठवणूक करणे गरजेचे आहे. या पावसामुळे खरीप पिकावर नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे पिके वाचवण्याकरता शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे.
🌪️🌀तसेच राज्यातील बर्याच भागात धुळीच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
🌧️⚡येत्या चोवीस तासांमध्ये या भागात पडेल पाऊस:
विदर्भ, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, उत्तर आंतरिक कर्नाटक आणि केरळच्या बर्याच भागांत मुसळधार पाऊस पडेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण आणि पश्चिम मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडेल. असे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.
🌀🌪️या भागामध्ये जोरदार वारे वाहतील
हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, तेलंगणा, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल आणि केरळमधील काही ठिकाणी जोरदार वारे वाहू शकतील. पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, उप-हिमालय पश्चिम बंगाल, आणि सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रॉयलसिमा, अरुणाचल प्रदेश, अंदमान