शेतकरी (Farmers) हा आपापल्या पद्धतीने शेती करत असतो. स्वतःच्या कल्पनेने अधिक उत्पन्न (income) घेण्याचा प्रयत्न करत असतो. असाच एक अनोखा प्रयोग एका ब्रिटिश नागरिकाने (British citizen) केला आहे. ज्याचे नाव डगलस स्मित आहे. 43 वर्षाचा असलेल्या डगलस नागरिकाने तब्बल टोमॅटोच्या एका फांदीवरुन 839 टोमॅटोचं उत्पन्न (Yield of tomatoes) मिळवलेलं आहे. टोमॅटोचे बी (Tomato seed) मार्च महिन्यात लावले होते आणि प्रत्येक रोपाला आठवड्यातून डगलस 3 ते 4 तास वेळ देतात.
वाचा –
🤔 चंदनाची शेती लागवड करून मिळवा लाखोंमध्ये उत्पन्न; पहा कसे सविस्तरपणे.
रोपांची लागवड कशी केली ?
डगलस स्मिश एक आयटी मॅनेजर आहेत. यांनी आपली आवड निवड जपत ऐकाच फांदीवर अधिक उत्पन्न मिळवले आहे. व अधिक उत्पन्नाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
या रोपांची लागवड ग्रीनहाऊस (Greenhouse) मध्ये केली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी सर्वात अधिक मोठे टोमॅटोचे रोपटे (Tomato seedlings) उगवण्यात रेकॉर्ड मोडला होता. हाच प्रयत्न पुढे चाली ठेवून भरघोस उत्पन्न काढले असल्याचे दिसत आहे. डगलस यांनी स्वतःच हे चॅलेंज घेतलं होतं. टोमॅटोचं पीक (Tomato crop) घेताना आणि ते तोडताना याची संपूर्ण काळजी घेतली, सर्व नियमांचं पालन केले. तसेच त्यांनी मातीच्या सँपलवर काम करून बिया पेरून टोमॅटोचं रोप (Tomato seedlings) तयार केले. या छोट्याशा लागवडीवर (cultivation) त्यांनी भरपूर मेहनत केली व याचे अधिक फळ मिळवले.
वाचा –
डगलस यांनी दुप्पट उत्पन्न घेत रेकॉर्ड नावी केला –
2010 मध्ये एकाच फांदीवर 448 टोमॅटोचं उत्पन्न बनवण्याचा रेकॉर्ड ग्राहम टँटर या नागरिकाच्या नावावर होता. आता डगलस यांनी त्यांच्यापेक्षा दुप्पट टोमॅटोचं (Tomato) उत्पन्न घेत हा रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे.
मेहनतीतून काढलेली फळे –
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी (Guinness World Records) व्हेरिफाय करण्यासाठी फळे तोडताना त्यांनी पोलिसांना देखील बोलावले होते. व त्यांनी त्यांच्या फार्ममध्ये लावलेल्या टोमॅटोच्या एका फांदीवरुनच तब्बल 839 तोडले. या नागरिकाने रेकॉर्ड ब्रेक (Record break) करून दाखविला. तिथे उपस्थितीमध्ये असलेली लोकही चक्रावून गेले. अशा पद्धतीने शेती केल्यास एकदिवस ऐका उंच ठिकाणी नक्की शेती पोहचेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा