कृषी तंत्रज्ञान

“या” शेतकऱ्याच्या मेहनतीची कमाल; पाण्याची टंचाई असलेल्या मराठवाड्यातही “काजू शेती” यशस्वी करून दाखवली; पहा लागवड व उत्पन्न…

The maximum of the labor of "this" farmer; "Cashew farming" was successful even in water-scarce Marathwada; See planting and yield

काजू शेती (Cashew farming) देशभरातही किनारपट्टीच्या पाणीटंचाई नसलेल्या भागांमध्येच काजूची लागवड मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. मात्र मराठवाड्यातही काजूची शेती (Cashew farming) चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते. लातूरमधल्या एका शेतकऱ्याने काजू शेतीतून यशस्वी (Cashew farming successful) करून दाखवली. उत्पादन, लागवड (Production, planting) याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा- महत्वाचे हवामान अंदाज: कोकण, गोवा, मराठवाडासह “या” ठिकाणी पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस..

काजूसाठी लागणारे हवामान-

भारताचा काजू उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. काजूच्या प्रक्रिया उद्योगात भारत पहिल्या स्थानावर आहे. काजूच्या झाडांना किनारी भागामधील दमट हवामान (Humid weather) गरजेचे असते. त्यामुळे आपल्याला देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर काजूचे उत्पादन घेतलेले मोठ्या प्रमाणावर जाणवतं.

वाचा – लाल भेंडी चक्क 800 रु. किलोने विकली जातेय; ऐका शेतकऱ्याचे उत्पादन पाहून व्हाल चकित

मराठवाड्यासारख्या भागात “या” शेतकऱ्याची काजू शेती यशस्वी –

योग्य काळजी घेतली, तर कोरड्या हवामानात (In dry weather) मराठवाड्यासारख्या कमी पावसाच्या असलेल्या तसेच किनारपट्टी नसलेल्या भागात सुद्धा काजू उत्पादन घेऊ शकतो हे लातूरमधल्या विष्णू कदम या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या उमरगा इथे राहणाऱ्या कदम यांनी 2016 साली कोकणातून काजूची दर्जेदार जातीची कलमं आणून दीड एकर नापीक जमिनीवर त्यांनी काजूच्या 100 कलमांची लागवड केली. त्यानंतर 4 वर्ष योग्य रीतीने व्यवस्थापन केले.

वाचा – स्ट्रॉबेरी, केशर नंतर सफरचंदचीही लागवड यशस्वी; “या” शेतकऱ्यांनी पिकवून दाखवली शेती…

शेतकरी कदम यांची काजू शेतीमधून कमाई-

यंदा उत्पादनाच्या पहिल्याच वर्षी त्यांनी दोन टन काजूचे उत्पादन घेतलं असून, 80 हजार रुपयांची कमाई केली आहे. उत्पादनाचं (income) हे पहिलंच वर्ष असल्याने येत्या काळात हे उत्पादन आणखी वाढेल आणि आणखी जास्त नफा होईल, असं कदम यांनी सांगितले. मराठवाड्यात काजूचे उत्पादन (Production of cashews) घेण्याचा कदम यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आजूबाजूच्या गावांतल्या शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

वाचा:  उच्च न्यायालय चा निर्णय: विवाहित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा म्हणता येणार नाही; वाचा सविस्तर निर्णय..

सध्या काजूच्या मागणी –

सणासुदीच्या काळात प्रक्रिया केलेल्या काजूगरांचा बाजार तेजीत असतो. सणासुदीला नेहमीपेक्षा दुप्पट उलाढाल होते. जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे (Covid-19) गेल्या दोन वर्षांपासून काजूगरांना चांगली मागणी मिळत नव्हती. सर्वत्र देशात पसरलेल्या कोरोना व्हायरस विरुध्द लढण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली असून भारतात 2021- 22 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था (Economy) पुनरुज्जीवन होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत असल्यामुळे यंदा भारतात काजूला मागणी वाढणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button