आपल्याला माहीत आहे. जमीन मोजणी करायची म्हणल्यावर लाखो रुपयांचा खर्च येतो. फक्त खर्चच नाही तर वेळही तितकाच खर्च होताना दिसतो. हा त्रास कमी करण्यासाठी भूमि अभिलेख विभाग (Department of Land Records) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा (Cutting edge technology) वापर सुरू करणार आहे. या तंत्रज्ञायाविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
_आता शेतकऱ्यांच्या हातात डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा; “या” तारखेपासून मोहिमेला सुरूवात केली..
भूमिअभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या (Survey of India) मदतीने राज्यात 77 ठिकाणी ‘कॉर्स’ (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे. याची तांत्रिक तपासणीचे काम सुरू आहे. त्यानंतर ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त 30 सेंकदात घेता येणार असून या सुविधेमुळे जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.
ईटीएस मशीनच्या साहाय्याने मोजणी
सध्या जमीन मोजणीसाठी ईटीएस (ETS) मशीनच्या साहाय्याने मोजणी करणे हा पण एक पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस (GPS) रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांक्ष व रेखांश घेतले जाते. या अक्षांक्ष व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस (GPS) रिडींग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात.
वाचा
ड्रोनचा वापर शेतीसाठी फायदेशीर; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याकडे केंद्र सरकारचे लक्ष..
सर्वे ऑफ इंडिया च्या मदतीने ‘कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग –
जीपीएस (GPS) रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडिया च्या मदतीने ‘कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कॉर्स स्टेशनचे जाळे उभारले आहे. सध्या सर्व्हे ऑफ इंडियाकडून (Survey of India) या स्टेशनची जीपीएस रीडिंगची अचुकता तपासणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कॉर्सद्वारे जमीन मोजणीस सुरुवात होणार आहे, ही भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
हे ही वाचा –