हरियाणातील नरेश यांनी “ह्या शेतीपूरक” व्यवसायातून कमवले, वीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न
The king of Haryana earned an annual income of twenty lakh rupees from this "agricultural" business
हरियाणा मधील हिस्सार जिल्ह्यातील नरेश जांग यांनी मधुमक्षिका पालन करण्याचा निर्णय घेतला. डिजिटल मार्केट मध्ये अनुभव असलेल्या नरेश शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्र बदलून टाकली.
आजही शेती क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची ताकद आहे त्यामुळे हरियाणातील युवक नरेश जांग यांनी गेल्या वर्षी लॉकडाऊन फायदा घेत मधुमक्षिकापालन करण्याचा निर्णय घेतला एका वर्षात या उद्योग प्रक्रियेमधून त्यांनी वीस लाख रुपये पर्यंत मजल गाठली.
नरेश जंग यांनी मधुमक्षिका पालन करताना मधाचे विविध पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. व त्याचबरोबर एका कंपनीची स्थापना देखील केली . डिजिटल मार्केटिंगचा अनुभव असल्यामुळे त्यांना कंपनीच्या उत्प1दन विक्री करताना त्याचा चांगलाच फायदा झाला, आणि कमी वेळेत त्यांनी त्यांच्या कंपनीची उलाढाल वीस लाखापर्यंत झाली.
नरेश यांच्या कंपनीतून 6 फ्लेवरचे मध तयार केले जातात. साधारणपणे तीन चार महिन्यात सात आठ क्विंटल मधाचे उत्पन्न होते. मध विक्री करताना ते पूर्व नोंद पद्धतीने ऑर्डर घेतात व त्यानुसार ते पुरवठा करतात एका पेटीतून साधारणपणे त्यांना 15 किलो मध मिळते.
नरेश यांनी आधुनिक शेतीच्या माध्यमातून कमी वेळेत अधिक उत्पन्न मिळवले आहेत, मध निर्मितीसाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याकरिता काही दिवसांपूर्वी मधुक्रांती नावाचे पोर्टल लॉन्च केले गेले आहे.
हे ही वाचा
१) फळबागा ची चटणी करताना घ्या विशेष काळजी
२) देशी गाईची प्रजनन अवस्थेमध्ये घ्या अशी काळजी