देशातील या बँकांचे आयएफएससी कोड बदलणार, एक जुलै पूर्वी करा ही कामे अन्यथा होईल आर्थिक नुकसान…!
The IFSC code of these banks in the country will be changed, do it before July 1, otherwise there will be financial loss…!
जर तुमचेही खाते विलीन झालेल्या त्या बँकांमध्येही असेल तर तुम्हाला तुमचा नवीन आयएफएससी कोड अपडेट करावा लागणार आहे.अन्यथा भविष्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
भारत सरकारने बँकाच्या एकत्रीकरण(Government of India Consolidation of Banks) योजनेचा भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरण योजना तयार केली होती. यानुसार 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman)सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांना राज्याच्या मालकीच्या बँकांमध्ये विलीन करण्याची घोषणा केली.
हेही वाचा : New Technology : आधुनिक पद्धतीमुळे ‘चक्रीवादळाचा’ अंदाज लवकर समजणार!
देना बँक,विजया बँक,ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स,
यूनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI),सिंडिकेट बँक
आंध्रा बँक,कॉर्पोरेशन बँक,इलाहाबाद बँक
देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये ( Bank If Badoda)झाले आहे.
तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकेत (PNB)करण्यात आले आहे.
तर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलीनीकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये(UBI) झाले आहे.
हेही वाचा : शेतकरी व शेतमजूर यांची शेती करताना अपघाती मृत्यू झाल्यास ‘या’ राज्यातील सरकार करणार आर्थिक मदत…
तसेच अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे.
तर सिंडिकेट बँकही कॅनरा बँकेत विलीन झाली आहे.
IFSC कोड अपडेट करावा लागणार आहे. जर तुम्ही हे केले नाही, तर अकाऊंटमध्ये पैसे जमा करणं अवघड होऊ शकते. तसेच तुम्हाला बँकेतून नवीन चेकबुकही (Check book)घ्याव लागणार आहे, कारण जुने चेकबुकही काही दिवसांनी बंद केले जाणार आहेत.
ज्यांच्या खातेधारकांना त्यांचे नवीन आयएफएससी (IFSC) माहित असणे आवश्यक आहे. येत्या 1 जुलैनंतर जुने कोड हे वैध राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांना त्याद्वारे व्यवहार करता येणार नाही.
हेही वाचा :
कापसावरील, गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळवण्यासाठी करा “या उपायोजना…