ताज्या बातम्या

असंघटित कामगारांसाठी सरकार सुरू करणार “हे” नवीन पोर्टल; जाणून घ्या कसा होईल फायदा..

The government will launch a new "this" portal for unorganized workers; Learn how to benefit ..

असंघटित कामगारांसाठी (Unorganized workers) एक दिलासायक बातमी आहे. सरकार एक पोर्टल आज सुरू करणार आहे. कामगारांना या पोर्टलद्वारे योजनांचा लाभ देण्याबाबत सरकारने (Government) विचार केला आहे. सरकारचे असे म्हणणे आहे की असंघटित कामगार या पोर्टलद्वारे ओळखले जातील. देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची (Workers) संख्या मोठी असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या फायद्याचा विचार करून सरकारने आज “इ-श्रम” नावाचं पोर्टल सुरू करण्याचं ठरवले आहे.

असंघटित कामगारांचा कोणताही अचूक डेटा सरकारकडे (To the government) नसल्याने हे पोर्टल फक्त कामगारांसाठी सुरू केले आहे. जेणेकरून त्यांना विविध योजनेचा लाभ घेता येईल. ई-श्रम पोर्टलची कामगारांची संपूर्ण माहिती नोंदवली जावी म्हणून व तसेच देशात 437 कोटी असंघटित कामगारांची आकडेवारी आहे यांना वेळेवर त्यांच्यापर्यंत योजनेच्या (scheme) सुविधा पोहचतील व सरकार योजनांचा लाभ देखील येईल या हेतून इ-श्रम पोर्टल सुरू करण्याचे ठरवले आहे.

वाचा : मोठी बातमी: LPG कनेक्शन सोबत मिळणार मोफत स्टोव्ह; या योजनेचा लाभ कसा घ्याल?

इ-श्रम पोर्टलचे फायदे –

हे पोर्टलच कामगारांपर्यंत योजना पोहचवण्याचा काम करेल. सरकारचे म्हणणे आहे की पोर्टल ओपन केल्यावर कामगार त्याची माहिती सविस्तर टाकेल त्यावरून सरकार त्यावरून सगळा डेटा गोळा करेल, त्यांच्या कामावरून व आधारकार्ड वरून त्यांच्यापर्यंत योग्य त्या योजना पोचवल्या जातील. कामगार पोर्टल (Portal) सुरू झाले की त्याठिकाणी नोंदणी करू शकतात. नोंदी करताना आधारकार्ड, बँकतपशील, जन्मतारीख, होमटाउन, मोबाईल नंबर इ. प्रविष्ट करा.

वाचा : “या” जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यासाठी अर्ज सुरू; पहा कसा अर्ज कराल..

नोंदणी झाल्यानंतर महत्वाची सूचना –

सरकारने म्हंटले आहे असंघटित कामगारांनी पूर्ण माहिती भरून नोंदणी केल्यानंतर तुम्हाला इ- श्रम 12 अंकी एक कोड देईल ज्यातून तुमची ओळख होईल. सरकार बांधकाम कामगार, रस्त्यावरील विक्रेते व घरगुती कामगार तसेच स्थलांतरित कामगारांना लाभ देईल. जवळपास 38 कोटी कामगारांची नोंदी करणार आहेत.

श्रम पोर्टलची सर्व ठिकाणी जनजागृती केली जाईल. असंघटित कामगारांना अधिक माहितीसाठी 14434 हा ट्रोल फ्री क्रमांक बनवत आहेत ज्यावरून अगदी सहजरित्या नोंदणी विषयी कामगार माहिती घेऊ शकतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button