ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Tur Stock Limit | बाजारात तुरीचे दर तेजीत! म्हणूनच सरकारने लावलं स्टॉक लिमिट; जाणून घ्या किती मिळेल दर आणि लिमिट?

Tur Stock Limit | सध्या बाजारात तुरीच्या दराचा बोलबला सुरू आहे. तुरीचे दर वाढले असतानाच सरकार दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला असून याचा परिणाम व्यापारी आणि शेतकरी यांच्यावर होऊ शकतो. तुरीचे दर (Tur Rate) नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने तुरीच्या स्टॉकवर (Tur Stock Limit) लिमिट ठेवण्याचा मोठा निर्णय आहे. चला तर मग जाणून घेऊयात सरकारकडून तुरीच्या (Tur Market Price) किती स्टॉकवर लिमिट ठेवण्यात आला आहे.

सरकारने का घेतला निर्णय?
खरंतर देशांमध्ये वाढलेले तुरीचे दर (Tur Stock Limit) आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने तुरीच्या स्टॉप वर लिमिट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशामध्ये यंदा तुरीचे उत्पादन घटले असून, याचा परिणाम थेट तुरीच्या दरावर होत आहे. बाजारात आवक कमी असल्याने तुरीच्या दराला आधार मिळत आहे. याचमुळे व्यापारी वर्ग बाजारातील आवक कमी करण्याचा प्रयत्न करून थेट दरात वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत.

किती आहे स्टॉक लिमिट?
सरकारने मोठ्या व्यापाऱ्यांसाठी तुरीच्या स्टॉकचं लिमिट 200 टन इतकं ठेवल आहे. तसेच किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 5 टन इतकी मर्यादा दिली आहे. याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगांना देखील वार्षिक उत्पादनासाठी तीन महिन्यांचा स्टॉक ठेवता येणार आहे.

कसा राहील तुरीचा दर?
जरी सरकारने तुरीचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाचा परिणाम फार काळ राहणार नाही. तुरीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच देशातील अनेक बाजारात सध्या तुरीला तब्बल 11 हजारांचा दर मिळत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The price of turi in the market is booming! That is why the government imposed a stock limit; Know exactly how much?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button