कृषी बातम्या

सरकारकडून या वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के अनुदान घोषित… वाचा सविस्तर पणे

The government has announced a 75 per cent subsidy for the cultivation of these plants

भारत हा एक शेतीप्रधान देश असून त्यामध्ये अनेक प्रकारची शेती केली जाते. असाच एक प्रकारची शेती म्हणजे औषधी वनस्पतींची हर्बल शेती. भारतामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळून येतात. त्यामध्ये पुदिना, मोगरा, तुळशी (Tulsi), ब्राह्मी, शतावरी, अश्वगंधा, भृंगराज इत्यादी वनस्पतींचा समावेश करता येतो. भारतामध्ये जवळजवळ 60 टक्के लोक हे औषधी वनस्पतींचे शेती करतात. हरबल वनस्पतींच्या विविध प्रकारच्या प्रजाती या भारतामध्ये उपलब्ध आहेत.

येत्या काळामध्ये औषधी वनस्पतींना (Herbs)मोठी मागणी असणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) बैठकीत आयुर्वेद, आयुष आणि वैद्यकीय शास्त्रावर भर देण्यात आला. त्यामुळे भारतातच नव्हे तर जागतिक कंपन्यांकडून सुद्धा आयुर्वेदिक औषधांची मागणी वाढू लागलेली आहे. त्यामुळे बदलत्या काळामध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व सगळ्यांना पटलेले आहे. तरीही जागतिक बाजारपेठेत मागणी वाढल्यामुळे शेतकर्‍यांनी औषधी वनस्पतींच्या शेतीकडे वळले पाहिजे.

हेही वाचा: मागेल त्याला शेततळे योजनेची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

भारत सरकार (Indian government) कडून हरबल शेतीला(Herbal farming) चालना देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम आखले गेले आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने हरबल वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के सबसिडी(75% subsidy)देण्याचे ठरवले आहे. भारतामध्ये राष्ट्रीय औषध बोर्ड (National Board of Medicine) द्वारे औषधी वनस्पतींचा विकास, नियोजन आणि संरक्षण याचा मोठा कार्यक्रम आखला गेला आहे. यांच्याकडून शेतकऱ्यांना नर्सरी साठी रोपे पुरवणे, बाजारपेठांची निर्मिती करणे याप्रकारे शेतकऱ्यांना मदत करत आहेत.

हेही वाचा: पहा पीक कर्ज घेण्याची संपूर्ण प्रोसेस फक्त एका क्लिकवर..

आत्मनिर्भर भारत(Self-reliant India )अभियानाच्या माध्यमातून भारत सरकारने आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून येत्या दोन वर्षात चार हजार कोटी रुपयांच्या मदतीने दहा लाख हेक्‍टर जमिनी औषधी वनस्पतींचा लागवडीखाली आणण्याचा निर्धार केलेला आहे. यामधून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल आणि कृषी क्षेत्राचा चांगला विस्तार होईल.

हेही वाचा….

‘या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?जाणून घ्या ; “संरक्षित शेती

योजनेची” माहिती व पात्र व्यक्ती व अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button