इतर

खुशखबर; शेतकरी मित्रांनो 1999 रुपयांचा Jio नेक्स्ट फोन लॉन्च झाला, लवकर असा करा बुकिंग व दिवाळीला घेऊन या घरी…

तुम्हाला दिवाळीला नवीन मोबाईल घरी घेऊन येता येणार आहे. फक्त 1999 रुपये चा jio नेक्स्ट फोन आलेला आहे. 1,999 रुपयांमध्ये फोन घेतल्यानंतर, उर्वरित रक्कम 18 किंवा 24 महिन्यांच्या ईएमआयवर भरावी लागेल. जर तुम्हाला EMI वर Jio फोन खरेदी करायचा नसेल तर तुम्ही थेट 6,499 रुपये भरून फोन खरेदी करू शकता.

वाचा – शेतकऱ्यांसाठी, हरभरा लागवडीसाठी या 2 वाणांचा वापर करा; 110 दिवसात मिळेल भरघोस उत्पन्न…

खूप दिवसानंतर जिओ फोन नेक्स्टच्या सेलची घोषणा करण्यात आली आहे. Jio नेक्स्ट फोन दिवाळीच्या दिवसापासून फक्त 1,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जिओ फोनची खरी किंमत 6,499 रुपये आहे. जर तुम्हाला EMI वर Jio फोन खरेदी करायचा नसेल, तर तुम्ही 6,499 रुपये देऊन थेट फोन खरेदी करू शकता. Jio चा हा नवीन स्मार्टफोन Rs 1,999 च्या डाउन पेमेंटवर खरेदी केला जाऊ शकतो, बाकीचे पैसे 18/24 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांमध्ये दिले जाऊ शकतात. चला जाणून घेऊया Jio च्या या नवीन फोनचे फीचर्स आणि बुकिंग बद्दल…

Jio Phone Next ची किंमत आणि विक्री तारीख जाहीर-

किंमत आणि विक्रीची तारीख जाहीर झाली आहे, पण तो कसा बुक केला जाईल हा मोठा प्रश्न आहे. पुढे जिओ फोनसाठी तुम्ही जिओच्या वेबसाइटवर जाऊ शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या जिओ स्टोअरलाही भेट देऊ शकता. 7018270182 या नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेज करून Jio फोन नेक्स्ट बुक करता येईल.

वाचा – शेतकऱ्यांनो तमालपत्राच्या शेतीतून कमवू शकता लाखों रुपये; पहा किती मिळते उत्पन्न…

पहिला प्लान ‘ऑलवेज ऑन प्लॅन’ आहे-

या प्लॅनमध्ये तुम्ही 18 महिन्यांसाठी EMI निवडल्यास तुम्हाला दरमहा 350 रुपये खर्च करावे लागतील, तर 24 महिन्यांच्या EMIसाठी तुम्हाला दरमहा 300 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला दर महिन्याला 5 GB डेटा आणि दर महिन्याला 100 मिनिटे कॉलिंग मिळेल. 100 मिनिटे संपल्यानंतर, तुम्हाला कॉलिंगसाठी रिचार्ज करावे लागेल.

दुसरी योजना आहे –

मोठा प्लॅन – 18 महिन्यांचा हप्ता घेण्यासाठी 500 रुपये आणि 24 महिन्यांच्या हप्त्यासाठी 450 रुपये भरावे लागतील. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळेल आणि अनलिमिटेड कॉलिंगही मिळेल.

तिसरा प्लॅन – XL – 18 महिन्यांच्या हप्त्यासाठी 550 रुपये आणि 24 महिन्यांच्या हप्त्यासाठी 500 रुपये प्रति महिना भरावे लागतील. हा 2 जीबी प्रतिदिन प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटासह अमर्यादित कॉलिंग मिळेल.

चौथा प्लॅन डबल XL आहे, ज्यामध्ये 18 महिन्यांसाठी 600 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 550 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळेल आणि त्यासोबत अनलिमिटेड कॉलिंगही मिळेल.

फोनमध्ये गोरिला ग्लास 3 संरक्षणासह 5.45-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये Qualcomm चा Quadcore QM 215 प्रोसेसर आहे. याशिवाय, फोनमध्ये 2 GB रॅमसह 32 GB स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने 512 GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे ज्यामध्ये नॅनो सिम घेतले जाईल. यात 3500mAh ची बॅटरी देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ असे पर्याय आहेत. हॉटस्पॉट सुविधाही देण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button