ताज्या बातम्या

Eknath Shinde | आंतरजातीय विवाह आणि लव्ह जिहादविरोधात कडक कारवाईची तयारी! शिंदे सरकारने उचललं मोठं पाऊल

Eknath Shinde | दिल्लीत श्रद्धा वालकरची हत्या करून तिचा मृतदेह 35 तुकडे करून फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याआधीही अनेक मुलींचे मृतदेह सुटकेसमध्ये सापडले आहेत. श्रद्धाच्या (Shraddha Walkar) प्रकरणात आफताब पूनावाला ( Aftab Poonawala) असे मारेकऱ्याचे नाव आहे. त्याचबरोबर इतरही अनेक प्रकरणांमध्ये दुसऱ्या समाजातील व्यक्ती आरोपी असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत आता लव्ह जिहाद (Law of Love Jihad) रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची मागणी होत आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तर गरज पडल्यास त्यांचे सरकार लव्ह जिहादविरोधात कायदा आणेल, असे जाहीर केले होते, परंतु आता राज्य सरकार या प्रकरणी पावले उचलताना दिसत आहे. श्रद्धाच्या वडिलांनी शुक्रवारीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतरच लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची बाब समोर येत आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! नियमित कर्जदारांच्या खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, जाणून घ्या सविस्तर

कधी घेणार सरकार निर्णय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांचे सरकार विधानसभेत लव्ह जिहादविरोधात कायदा आणणार आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या लव्ह जिहादविरोधी कायद्यात आंतरधर्मीय संबंधांवर कोणतेही बंधन नसले तरी श्रद्धा वालकरसारख्या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची तरतूद केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी लागेल. लव्ह जिहादविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

लव्ह जिहाद
यापूर्वी यूपीसह काही राज्यांनी प्रेमातून होणाऱ्या धर्मांतराविरोधात कायदा केला होता. हे कायदे आणल्याबद्दल राज्यांचे खूप कौतुक झाले आहे. लव्ह जिहादचे प्रकरण अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांचे सरकार यासंदर्भात कायदा आणून इतर राज्यांनाही तोच मार्ग अवलंबण्यास भाग पाडू शकते. महाराष्ट्रानंतर भाजप आणि एनडीएची सत्ता असलेली इतर राज्येही लव्ह जिहादविरोधात कठोर शिक्षेचे कायदे करणार असल्याचे मानले जात आहे.

वाचाबाजारात लाल मिरचीचा ठसका वाढला! आवक कमी असल्याने मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या अजूनही दरात होईल का वाढ?

सरकारने टाकल पहिलं पाऊल
हिवाळी अधिवेशनापूर्वी लव्ह जिहादप्रकरणी महाराष्ट्र सरकारने पहिलं पाऊल टाकले आहे. राज्य सरकारने आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांच्या समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केलीय. श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर या कायद्याच्या चर्चांना उधाण आलंय.

काय असेल समितीचे कार्य?
• आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह केलेल्या नवविवाहीत मुली किंवा महिला यांच्या कुटुंबांशी संपर्क साधून त्यांची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेणार आहे.
• त्याचबरोबर या मुली त्यांच्या कुटुंबांशी संपर्कात आहेत का? हे ही समिती जाणून घेणार आहे.
• आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली किंवा महिला जर कुटुंबाशी संपर्कात नसल्यास त्यांच्या मुलीसोबत तिच्या आई वडिलांचा पत्ता घेतला जाईल.
• आई-वडील इच्छुक नसल्यास तज्ज्ञ समुपेदशकांकडून त्यांचं समुपदेशन केलं जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Preparing for strict action against inter-caste marriage and love jihad! A big step taken by the Shinde government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button