ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Namo Shetkari Yojana | बिग ब्रेकींग! नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता येणारं दसऱ्यापूर्वी; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Big Breaking! First installment of Namo Shetkari Mahasanman Nidhi will arrive before Dussehra; Keep these documents ready

Namo Shetkari Yojana | पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा (Namo Shetkari Yojana) पहिला हप्ता दसऱ्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत.

नमो शेतकरी महासन्मान योजना
जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत साडेतीन लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यापैकी आयकर भरणारे शेतकरी व शेती नावावर असलेले नोकरदार यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दोन लाख 80 हजार शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

वाचा : Namo Shetkari | नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ अटी त्वरित पूर्ण करा ; अन्यथा होऊ शकते नुकसान !

‘ही’ कागदपत्रे आवश्यक
राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण दसऱ्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना आधार कार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (७/१२ उतारा आदी) तयार ठेवावे लागणार आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार असून, शेतीचा विकास होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

Web Title: Big Breaking! First installment of Namo Shetkari Mahasanman Nidhi will arrive before Dussehra; Keep these documents ready

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button