ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | पंतप्रधानांच्या हस्ते राज्यातील ८५ लाख शेतकऱ्यांच्या ‘नमो शेतकरी योजने’चा पहिला हप्ता ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा

The first installment of 'Namo Shetkari Yojana' of 85 lakh farmers of the state will be deposited in the accounts of the Prime Minister on this day

Yojana | राज्य सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा (Namo Shetkari Yojana) पहिला हप्ता गुरुवारी शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. राज्य सरकारने पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे.

पीएम किसान योजना
पीएम किसान
योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे, खात्यांना आधारची जोडणी करणे या निकषांची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आली नव्हती. पंधराव्या हप्त्यासाठी हे निकष बंधनकारक आहेत. राज्याच्या योजनेसाठीही हे निकष लागू केले आहेत. पीएम किसान योजनेमध्ये चौदाव्या हप्त्यासाठी ८५ लाख ६० हजार ७३ शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मान्यता दिली होती.

वाचा : Namo Shetkari | नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ अटी त्वरित पूर्ण करा ; अन्यथा होऊ शकते नुकसान !

स्वतंत्र पोर्टल
राज्यासाठी देखील पीएम किसान पोर्टलसारखेच स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची जबाबदारी महाआयटीकडे देण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रविवारी जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होतील. पंतप्रधान मोदी गुरुवारी शिर्डीत दर्शन घेऊन नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरित करतील. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

Web Title: The first installment of ‘Namo Shetkari Yojana’ of 85 lakh farmers of the state will be deposited in the accounts of the Prime Minister on this day

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button