कृषी बातम्या

“पंतप्रधान किसान निधी” (Prime Minister’s Farmers Fund) चा आठवा हप्ता येणार “ह्या” महिन्यात…

The eighth installment of "Prime Minister's Farmers Fund" will come this "month"

केंद्र व राज्य सरकार (Central and State Governments) शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते.त्यातील अत्यंत महत्त्वाची शेतकऱ्यांची योजना म्हणजे पंतप्रधान किसान निधी योजना शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळत असतात. या योजनेचा सातवा हप्ता डिसेंबर महिन्यात देण्यात आला होता परंतु कोविड महामारीमुळे सध्यातरी पंतप्रधान किसान निधी या योजनेचा हप्ता(Week)लांबणीवर पडताना दिसत आहे

.हे ही वाचा: १) शेतामध्ये घ्या अशा प्रकारे नवीन वीज जोडणी सविस्तर वृत्तांत पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

आता पंतप्रधान किसान निधी चा आठवा हप्ता “मे” महिन्यात पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
कोरोनाची(Corona)महामारी भीषण प्रकारे भारतामध्ये संचारित झाले आहे देशावर सामाजिक एकच नव्हे तर आर्थिक देखील संकट आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत येणारा हप्ता येण्यास विलंब होत आहे असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

*कसा कराल आपला हप्ता आला आहे की नाही स्टेटस चेक..

१)आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी (pmkisan.gov.in) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
येथे उजव्या बाजूला एक फार्मर्स कॉर्नर आहे. तिसर्‍या क्रमांकावर लाभार्थी स्थितीचा कॉर्नर आहे.

२) लाभार्थी स्थितीवर क्लिक केल्यास एक विंडो ओपन होईल.

३) त्यामध्ये आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल नंबरची माहिती प्रविष्ट करा आणि गेट डेटावर क्लिक करा.

दौंड मधील महिलांनी लढवली शक्कल! गोवऱ्या विकल्या थेट ऑनलाईनच; वाचा व ऐका त्यांच्या यशाची गाथा…

४) गेट डेटा क्लिक (Data click) केल्याने शेतकऱ्याशी संबंधित सर्व माहिती ओपन होईल. आतापर्यंत किती हप्ता पाठविला गेला आहे व कोणत्या तारखेला आहे याची यादी तिथे नोंदविली गेली आहे.

५) आता आपल्याला आगामी हप्त्याचा कॉलम पहावा लागेल. यामध्ये वेटिंग फॉर अप्रूवल बाय(Waiting for approval by ) स्टेट लिहिले असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला आता प्रतीक्षा करावी लागेल. राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील.

६) आएफटी साईन्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट लिहिले असेल तर याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा डेटा तपासला गेला आहे.

ऊसदराचा (एफआरपी) प्रश्न पुन्हा पेटणार! जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?

७) एएफटीओ इज जनरेटेड अँड पेमेंट कंन्फर्मेशन इज पेंडिंग (Generated and Payment Confirmation)असे लिहिले असेल तर याचा अर्थ आपल्याला आपल्या खात्यात लवकरच पैसे मिळू शकता.

हेही वाचा:

रेशन मिळण्याबाबत काही अडचण आल्यास या नंबर वर कॉल करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button