ताज्या बातम्या

Ration Card | अखेर ते दिवस ठरले! रेशन कार्ड धारकांना किराणा किट म्हणजे आनंदाचा शिधा कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती…

Ration Card | रेशनकार्ड धारकांना सरकारकडून गिफ्ट –

दिवाळीला सरकार राशन कार्ड धारकांना दिवाळीचा पॅकेज देणार आहे . या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांना केवळ 100 रुपयांमध्ये दिवाळीमध्ये लागणाऱ्या किराणा वस्तूंचे पॅकेज(lifestyle) मिळणार आहे. बाजारात ३०० ते ३५० रुपयांना मिळणारी ही किट सरकारमार्फत अगदी 100 रुपयांमध्ये दिली जाणार आहे.याचा फायदा राज्यातील 7 कोटी कुटुंबांना मिळणार आहे. ‘ आनंदाचा शिधा’ असे नाव सरकारने या किटला दिले आहे.

वाचा: बिग अपडेट: पिकांचं नुकसान झाल्यास 72 तासात पीकविमा योजनेकडे करा तक्रार; नाहीतर नाही मिळणार पीकविमा; पहा कस कराल तक्रार…

किट मध्ये काय मिळणार –

केवळ 100 रुपयांमध्ये रवा, हरभरा डाळ, साखर व पामतेल हा शिधाजिन्नस संच रेशन दुकानावर मिळणार आहे. सध्या बाजारात या किराणा मालाची किंमत अंदाजे 300 रुपये आहे. दिवाळीमध्ये ऐन सणासुदीच्या काळात महागाई (lifestyle) वाढली तर हा किराणा जवळपास 350 रुपयांना मिळू शकतो. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गरिबांच्या किराणा खर्चात बचत होणार आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! लाखो-करोडो रेशनधारकांना होणार मोठा फायदा, जाणून घ्या सविस्तर

याचा केव्हा मिळणार लाभ ?

दरम्यान आजपासून राज्य सरकारमार्फत ‘आनंदाचा शिधा’ चे किट विविध जिल्ह्यांमध्ये वाटप सुरु होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे . तसेच या किटच्या पुड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असणार आहेत. मात्र, अजूनही काही ठिकाणी किट पोचलेले नाही. त्यामुळे तेथील लाभार्थींना एक-दोन दिवस वाट पाहावी – असे राज्य सरकारने(lifestyle) म्हटले आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: प्रोत्साहन अनुदानास आज शुभारंभ: कोणत्या वर्षी कर्ज घेतलेले शेतकरी असणार आहेत लाभार्थी? तर निकष ही पहा…

या कार्डधारकांना होणार फायदा –

ज्या रेशनिंग कार्ड वरती दोन व तीन रुपये किलो दराप्रमाणे गहू तांदूळ भेटतात त्यांना याचा लाभ मिळणार आहे. पांढरे रेशनिंग कार्ड असणाऱ्या ग्राहकांना (lifestyle) याचा लाभ घेता येणार नाही. केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The day has finally come! When will ration card holders get grocery kit i.e. Anda ration? Know more details…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button