रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली या गावच्या देवराईमध्ये 150 वर्षे जुनं असलेलं झाड (tree) आहे. या झाडाचे नाव रक्त चंदन आहे. बाजारात रक्त चंदनाची लागवड (Cultivation of blood sandalwood) मागणी अधिक असल्याने या झाडाची किंमत (The price of the tree) देखील तेवढीच आहे. सध्या या झाडाची चर्चा सर्व ठिकाणी चाललेली आहे. या झाडाविषयी सविस्तर माहीती घेऊया..
वाचा –
रक्त चंदनाचा उपयोग?
उच्च प्रतिची दारू, मूर्तीकलेचा वापर, तसेच आयुर्वेदामध्ये (Ayurveda) देखील याचा सुज किंवा मुकामार लागल्यास रक्त चंदनाचा उपयोग होतो.
या ठिकाणी रक्त चंदनाचा मोठा व्यापार चालतो –
रक्त चंदन हे विशेषता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळतात. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, संयुक्त अमिरात इत्यादी ठिकाणी याचा मोठा व्यापार होतो.
वाचा –
कोकणात रक्त चंदन झाड कसे?
हे झाड आले कसे हे अद्याप कोणालाच कळले नाही. फक्त हे झाड (tree) औषधी आहे. इतकेच माहीत होते. सध्या गावचे नागरिक वनविभाग, महसुल विभाग देखील यावर जातीनं लक्ष ठेवून आहेत. तसेच सुरक्षितेमध्ये गावकऱ्यांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे. या सगळ्यांच्या साथीने या झाडाची सुरक्षा करण्यात मदत होत आहे.
100 कोटी किंमत कशी ठरवली –
जाणकार अभ्यासकांशी संवाद साधल्यावर ही किंमत काढली गेली आहे. रक्त चंदनाची मागणी अधिक असल्याने झाड जवळपास 50 ते 100 कोटी रुपयांच्या घरात आहेत. एक किलो रक्त चंदनाची किंमत 5 हजार रुपये आहे. तसे हे झाड जवळपास 150 वर्षांपूर्वीचे जुने झाड आहे. वजनही तसेच आहे. या झाडाचे लाकूड पाण्यात तरंगत नाही वजन अधिक असल्याने ते बुढते. चीन तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील याला मोठी मागणी आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा