कृषी बातम्या

गाईच्या शेणापासून तयार होणार रंग! या प्रकल्पासाठी नितीन गडकरी असणार ब्रँडॲम्बेसिडर वाचा सविस्तर बातमी…

The color will be made from cow dung! Nitin Gadkari will be the brand ambassador for this project वा Read detailed news

गाईचे बहुपयोगी शेण (Dung) वेदिक पेन्टच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण उद्योजकांना या क्षेत्रात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.जयपुर मध्ये शेणा पासून रंग तयार करण्याच्या स्वयंचलित यंत्राच्या उद्घाटन करताना ते बोलत होते.

आयोगमार्फत 12 जानेवारी रोजी शेणापासून बनवलेल्या पेंटचे लॉन्चिंग (Launch of paint) करण्यात आले होते, शेणापासून बनवलेले पेंटचे वैशिष्ट्य म्हणजे हा रंग विषमुक्त आणि इको फ्रेंडली (Toxin free and eco friendly) असा आहे.

हे ही वाचा : गाजर’ लागवडीबाबत माहिती जाणून घ्या; फक्त एका क्लिकवर

[metaslider id=4085 cssclass=””]

या रंगाचे पेटंट हे कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटने (Kumarappa National Handmade Paper Institute) मिळवले आहे. या रंगांमध्ये शेणाबरोबर शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम (Lead, mercury, chromium, arsenic and cadmium) चा उपयोग केला जातो. शेणापासून तयार केलेल्या रंगाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्यास, गाईच्या शेणाची मागणी वाढून शेतकऱ्यांच्याकडे असलेल्या शेणाची खरेदी वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून शकेल.

हे ही वाचा : वन्यप्राण्यांकडून’ शेतीचे, जनावरांचे, मनुष्याचे नुकसान झाल्यास, नुकसानभरपाईसाठी ‘अश्याप्रकारे’ करा ऑनलाइन अर्ज !

सध्या जयपूरमध्ये याबद्दल प्रशिक्षण देण्यात येत आहे.हे प्रशिक्षण घेतलेस गावातील लोक शेणापासून रंग बनवण्याचे कंपनी स्थापन करू शकतात. गावात एक नवीन रोजगार निर्मिती होऊ शकते हे प्रशिक्षण सात दिवसाचे असते या कार्यक्रमाला केंद्र सरकार देखील प्रोत्साहन करत आहे.
या प्राकृतिक पेन्टच्या प्रसारासाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari) सदिच्छादूत म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

कांदाचे उत्पादन’ क्षमता वाढवण्यासाठी,’केंद्र सरकारची ठोस पाऊले’ वाचा सविस्तर बातमी…

दूध उत्पादकांना दिलासा! दुधाच्या दरासंदर्भात लवकरच कायदा येणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button