कृषी बातम्या

ब्रेकींग! मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतले एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णय; थेट शेतकऱ्यांचं बदलणार नशीब

Eknath Shinde | आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील जवळपास 65 टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर (Agricultural Business) अवलंबून आहे. अनेकदा शेतकऱ्यांना शेती करताना आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागतो. म्हणूनच राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेऊन शेतकऱ्यांना (Agri News) दिलासा देण्याचा प्रयत्न करत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे नशीब बदलण्याचा मोठा प्रयत्न केला आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार शेततळे; अनुदानातही झाली ‘इतकी’ वाढ

कृषी महोत्सव उद्धाटन सोहळा
17 व्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी (Department of Agriculture) महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज कराड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यातील शेतकरी (Agricultural Information) सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे याप्रसंगी नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग न्यूज: राज्यात ‘या’ अभियानअंतर्गत 100 दिवसांत होणार 5 लाख घरे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

शेतकऱ्यांसाठी घेतले महत्त्वपूर्ण निर्णय
शेतकरी राजा सुखी समाधानी व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा असून त्यासाठी त्याला सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच नियमित कर्जफेड (Loan) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या 50 हजार रुपयांची मदत देण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) दिलासा मिळालं आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना सहज मिळणार पीक कर्ज; ‘ही’ जाचक अट रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

कर्जमाफी करण्याचा घेतला निर्णय
अतिवृष्टीमुळे (Insurance) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली आहे. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना मोठा दिला आहे.इतकचं नाही, तर भूविकास बँकेतून कर्ज (Bank Loan) घेणाऱ्या शेतकऱ्यांना 964 कोटींची कर्जमाफी देखील केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांच्यापर्यंत पाणी पोहचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! The Chief Minister took more than one bold decision for the farmers; The fate of farmers will change directly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button