कृषी बातम्या

आर्थिक व्यवहारांसाठी केंद्र सरकार आणतेय इ-रुपी सेवा, वाचा ‘हे’ कसे काम करणार?

The central government is bringing e-rupee service for financial transactions, read 'How' will this work?

कोरोनाच्या( Corona) कालावधीमध्ये अनेक जणांनी कॅशलेस (Cashless) सुविधा वापरण्यास सुरुवात केली आहे, केंद्र सरकार देखील डिजिटल व्यवहारांना (Digital transactions) प्रोत्साहन देत आहेत. केंद्र सरकार डिजिटल वाहनांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे व त्यासाठी ‘इ -रुपी’ सेवा (‘E-Rupee’ service) शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे.

भारतामध्ये डिजिटल माध्यमांमध्ये व्यवहार केले जावेत यासाठी केंद्र सरकार नेहमीच प्रयत्नशील असते यातील अत्यंत क्रांतिकारी पाऊल म्हणून इ -रुपी सेवाकडे पहिले जात आहे. इ रुपीमुळे ‘इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर’ (‘Electronic Voucher’) पुढे येऊन सुशासन निर्माण होण्यास मदत होईल अशी आशा जाणकारांकडून व्यक्त होत आहे. कॅशलेस व्यवहारांमुळे इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास अधिक मदत होते.

काय आहे इ -रुपी सेवा?

एक आर्थिक व्यवहाराचे डिजिटल माध्यम आहे यामध्ये क्यूआर कोड (QR code) किंवा एसएमएस स्ट्रिंग आधारित ई-व्हाऊचर व्यवस्था आहे ज्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवला जातो.

या माध्यमाचा उपयोग अनेक सरकारी योजनांसाठी, आरोग्य विभागाचे योजनांसाठी, त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी देखील याचा उपयोग करू शकतात.ही सेवा उपलब्ध करण्यासाठी अर्थविभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Family Welfare) तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची (Of the National Health Authority) मदत घेण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button