मोठी बातमी: रब्बी हंगामातील या पिकाची 43 हजार कोटी रुपयांची केंद्र सरकारने केली मोठी खरेदी…
The central government has made a big purchase of this rabi season crop worth Rs 43,000 crore हंगा
भारत सरकार (Government of India) ने रब्बी हंगामातील गहू खरेदी करण्याचे काम चालू केले आहे. शेतकऱ्यांकडून गहू खरेदीला सुरुवात झाली आहे. दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब (Punjab), हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यातील गहू खरेदी (Wheat Purchase) करण्यात चालू केले आहे. सरकारने गव्हाला आधारभूत किंमत देण्याचे ठरवले आहे. बावीस लाख शेतकऱ्यांकडून 232 लाख मेट्रिक टन गहू सरकारने आजपर्यंत खरेदी केला आहे. सरकारने खरेदी केलेल्या गव्हाची पूर्ण किंमत 43 हजार कोटी रुपये होणार आहे.
हेही वाचा:“पंतप्रधान किसान निधी” (Prime Minister’s Farmers Fund) चा आठवा हप्ता येणार “ह्या” महिन्यात…
डाळ खरेदीचा पण शेतकऱ्यांना झाला फायदा… महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू या राज्यातील शेतकऱ्यांकडून सरकारने डाळींचे विक्रमी खरेदी केली आहे. गेल्या वर्षीच्या झालेल्या खरीप हंगामात मूग, तूर, उडीद, मसूर, सोयाबीन इत्यादी डाळींची खरेदी करण्यात आली आहे. सरकारने जवळ-जवळ पावणेचार लाख(Approx. 3.75 lakh) शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी केली त्याचा जवळ-जवळ तीन हजार कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
गाठी कापूस (bales of cotton) खरेदी पण जोरात.. गाठी कापूस खरेदी करण्यासाठी सरकारने किमान आधारभूत किंमत (Minimum base price) शेतकऱ्यांना देऊ केले आहे. मध्य प्रदेश (MP), पंजाब, हरियाणा, आंध्रप्रदेश, ओडिसा , महाराष्ट्र, गुजरात,तेलंगणा मध्यप्रदेश,राजस्थान या राज्यांमधून कापूस खरेदीला सुरुवात केलेली आहे.
सरकारने जवळजवळ 92 लाख मेट्रिक टन गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे. 19 लाख शेतकऱ्यांकडून जवळ-जवळ 27 हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी करण्यात आला.
हेही वाचा… पीक काढणीनंतर ची सगळी कामे होतील या एकाच मशीन ने, जाणून घ्या यंत्राबद्दल ची संपूर्ण माहिती…
कृषी संबंधित बियाणे, खते, कीटकनाशके कृषी साहित्यांचा अडथळा दूर करणे बाबत आला सरकारचा नवीन जीआर…
One Comment