ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

MSP Rate | केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचा वाढवला एमएसपी; जाणून घ्या कोणत्या पिकाला किती वाढला एमएसपी?

Union Government Raises MSP of Farmers' Crops; Know how much the MSP has increased for which crop?

MSP Rate | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या संदर्भात सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने अनेक पिकांवर एमएसपी (MSP Rate) वाढवला आहे. सरकारने सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी 2 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे, ज्याला सरकारने मान्यता दिली आहे.

किती वाढला एमएसपी दर?
सरकारने एकूण 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बार्ली, गहू, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल यांचा समावेश होतो. गहू 150 रुपये, तेलबिया आणि मोहरी 200 रुपये प्रति क्विंटल, मसूर 425 रुपये प्रति क्विंटल, बार्ली 115 रुपये, हरभरा 105 रुपये आणि सूर्यफुलाच्या दरात 150 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे.

वाचा : MSP Rate | दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! गव्हासह ‘या’ पिकांच्या एमएसपीमध्ये करणार वाढ

What is MSP? एमएसपी म्हणजे काय?
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळावा यासाठी एमएसपी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. एमएसपी अंतर्गत, सरकार पिकांसाठी किमान किंमत ठरवते, याला किमान आधारभूत किंमत म्हणतात. त्याचा फायदा असा की, जर कधी पिकांचे बाजारभाव घसरले, तर केंद्र सरकार या एमएसपीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते.

हेही वाचा :

Web Title: Union Government Raises MSP of Farmers’ Crops; Know how much the MSP has increased for which crop?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button