मोठी बातमी, या जिल्ह्याला सर्वाधिक पीक विमा परतावा; किती रक्कम मंजूर? पहा सविस्तर..
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत (PM Crop Insurance Scheme) इफ्को टोकीयो (IFFCO Tokyo) जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२१ – २२ साठी नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी (farmer’s) विमा योजनेत सहभाग घेतला होता. खरिप हंगामाच्या काळात प्रारंभी २२ दिवसाचा खंड पडला. यावेळी जिल्हा प्रशासनाने अधीसूचना काढून शेतकऱ्यांना (farmer’s) आगाऊ पंचवीस टक्के भरपाई देण्याची भूमिका घेतली. वेळोवळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करुन परतावा मंजुरीचे काम केल्यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांना (farmers) राज्यात सर्वाधिक ४५८ कोटी विमा परतावा विक्रमी वेळेत मंजूर झाला आहे.
वाचा –
सहा पिकांसाठी भरला विमा
जिल्ह्यातील नऊ लाख १० हजार ९४१ अर्जदार शेतकऱ्यांनी उडीद, मुग, तूर, कापूस, ज्वारी व सोयाबीनसाठी ४४ कोटी ९५ लाखांचा विमा हप्ता भरला होता. तर केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी २९४ कोटी ९२ लाख ४७ हजार ९०१ रुपयानुसार विमा कंपनीकडे जिल्ह्यात प्रिमीयम ६३० कोटी ८० लाख ३४८ रुपये जमा होणार आहे. यातून पाच लाख १६ हजार ९५१ हेक्टर क्षेत्र संरक्षीत करण्यात आले होते. तर विमा संरक्षीत रक्कम दोन हजार १६२ कोटी ८६ लाख निर्धारीत करण्यात आली होती.
वाचा –
पीकनिहाय मंजूर झालेला परतावा –
पीक मंजूर परतावा रक्कम लाभार्थी शेतकरी
उडीद ४,२७,४७,६७१ ४४,४२६
कापूस ३ ,८५,२०,९१३ १४,५१३
मूग ३,८४,६१,९७३ ४४,५८६
तूर २,४५,५६,९८२ १७,१७४
ज्वारी १,६०,८६,२१० १२,२१३
सोयाबीन ४४२,८५,९९,९६२ ५,८९,५३१
एकूण ४५८,८९,७३,७११ ७,२२,४४३
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर विमा परतावा मिळावा, यासाठी कृषी विभागासह विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. यामुळे कमी वेळेत राज्यात सर्वाधिक विमा नांदेडला मंजूर झाल्याचे येथील शेतकरी समाधान आहेत.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –