यशोगाथा

मोठी बातमी, या विद्यार्थ्यांनी बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; शेतीची कामे होणार अत्यंत कमी खर्चात, पहा सविस्तर माहिती..

शेतकऱ्यांसाठी एक कौतुकास्पद गोष्ट आहे. हरियाणा येथील कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार केला आहे. यांच्या मेहनतीला व विचारशक्तीला सॅल्युट करण्यासारखी गोष्ट आहे. या इलेक्ट्रीक ट्रॅक्टर विषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

इलेक्ट्रीक ट्रॅक्टरचे फायदे –

डिझेल चलित ट्रॅक्टरद्वारे होणारे हे प्रदूषण नव्याने विकसित केलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे कमी होऊ शकते. याचा सर्वांच्या आरोग्यासाठी फायदाच आहे. खर्च कमी डिझेल पासून सुटका आणि शेतीची मशागतही परवडणारी होईल.

वाचा –

शेतकऱ्यांचा फायदा –

एम. टेक.चे विद्यार्थी वेंकटेश शिंदे यांनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला सोबत त्यांना कृषियंत्रे आणि ऊर्जा अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञ मुकेश जैन यांचे मार्गदर्शन ही लाभले. एका चार्जिंगमध्ये प्रति तास २३.१७ किमी इतक्या वेगाने सुमारे ८० किमी जाऊ शकतो. या ट्रॅक्टरचा देखभाल व चालण्याचा खर्च अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यामध्ये वाढ होईल.

इतका वाचेल खर्च –

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर चालवण्याचा प्रति तास खर्च ३३२ रु, मोल्ड बोर्ड नांगर चालवण्याचा प्रति तास खर्च ३०१ रु. इतका कमी होईल. डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई ट्रॅक्टरचा खर्च १५ ते २५ टक्क्यांपर्यंत कमी येतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button