कृषी सल्ला

मोठी बातमी, शेततळे योजनेसाठी 50 हजार इतके किमान अनुदान मिळणार; आजच अर्ज करा, पहा अटी व शर्ती..

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार (State Government and Central Government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना आणलेली आहे. मागेल त्याला शेततळे (shettale) ही योजना आहे. या योजनेसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया.

वाचा –

50 हजार इतके किमान अनुदान –

टंचाईग्रस्त भागामध्ये पाण्याचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी ही योजना राबविली जाते. या योजनेचे मुख्य उद्दिष्टे हे आहे. या सोबत जमीन लागवडीकरिता आणण्याचे उद्दिष्ट सरकारचे होते. शेती उत्पन्नामध्ये शाश्‍वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे गरजेचे ठरते. या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण सर्वात मोठ्या आकाराचे शेततळे 30×30×3 मीटर असून सर्वात कमी आकाराचे 15×15×3 मिटर आहे. मोठ्या आकाराच्या शेततळ्यासाठी रुपये 50 हजार इतके किमान अनुदान देण्यात आले आहे. 50 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याने स्वतः करायची आहे. असे सांगितले आहे.

वाचा –

शेततळ्यासाठी असणाऱ्या अटी –

शेततळ्याची मागणी करण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करा.

कृषीविभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे करण्यात यावे.

शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करावे लागणार.

शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजाती वनस्पतीची लागवड करावी लागणार तसेच शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी देखील शेतकऱ्यांची राहील.

पावसाळ्यामध्ये तळ्यात गाळ वाहून येणार नाही व साचणार नाही याची व्यवस्था तुम्हाला करावी लागणार.

शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावी लागणार.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

1) http://egs.mahaonline.gov.inया संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
2) अर्ज भरण्यासाठी प्रोफाइल वरून लॉगिन करा. व्यक्तिगत किंवा सामूहिक शेततळे हा पर्याय निवडा.
3) त्यानंतर अर्ज दाखल करून एप्लीकेशन नंबर लिहून ठेवा.
4) उल्लेख केलेल्या कागदपत्रांचा पीडीएफ मध्ये अपलोड करून सबमिट करा. डाऊनलोड केलेल्या फॉर्मवर सही करण्यासाठी जिथे जागा असेल तीथे सही करा.
5) तसेच दारिद्र्य रेषेखालील दाखला (असेल तर), आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वारस दाखला (असेल तर) जमा करावा लागेल. तसेच सातबारा उतारा इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून ठेवा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button