मोठी बातमी, बिनव्याजी कर्ज योजनेचा निधी आला; “या” शेतकऱ्यांना व्याजदर सवलत दिली जाणार..
बिनव्याजी पीककर्ज (Interest free crop loans) योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकर्यांनी आपल्या अल्पमुदत पिककर्जाची विहित मुदतीमध्ये परत फेड केलेली आहे. अशा शेतकर्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या व्याजाची प्रोस्ताहनपर रक्कम परतफेड म्हणून जमा केली जाणार आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्वपूर्ण शासन निर्णय दि. ८ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेला आहे. काय आहे शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया..
वाचा –
मोठी बातमी; वैयक्तिक शेततळे अस्तिरीकरण योजनेस मंजुरी, या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? पहा सविस्तर..
30 जून पर्यंत शेतकऱ्यांना व्याज सवलत –
राज्यातील शेतकर्यांना सहकारी कृषी पत संस्थांमार्फत व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोस्तःहनात्म्क सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक २४-११-१९९१ च्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दि १-४-१९९० पासून पिक कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पिक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी ३० जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृत बँका, ग्रामीण बँका व खासगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यानाही योजना लागू आहे. मात्र थकीत कर्जास, तसेच, मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास हि योजना लागू नाही.
वाचा –
या योजनेंतर्गत शेतकर्यांना सहकारी कृषी पतसंस्थेमार्फत व बँकामार्फत मिळणाऱ्या पिक कर्जावरील व्याज दराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे. दि ३-१२-२०२१ रोजीच्या शासननिर्णयानुसार रुपये १.०० लाखापर्यंतच्या पिक कर्जावर वार्षिक ३% व त्यापुढील रुपये ३.०० लाखापर्यंतच्या पिक कर्जावर वार्षिक १% दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली होती. तसेच शासनाने दिनांक ११-६-२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्व्ये रुपये ३.०० मर्यादेपर्यंत अल्प मुदत पिक कर्ज घेवून त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना केंद्र शासनाने ३% व्याज सवलत विचारात घेवून सदर कर्ज शेतकर्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे.
वाचा –
2021-22 या आर्थिक वर्षासाठी मंजूर निधी –
राज्य शासनाच्या धोरणास अनुसरून डॉ. पंजाबराव. देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत रु. १०४००.०० लाख एवढी अर्थसंकल्पीय तरतूद सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी मंजूर आहे. त्यापैकी सदर योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ६०% इतका निधी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रु. ६२४०.०० लाख निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
शासन निर्णय –
सन २०२१-२२ या वर्षात डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत (२४२५ १००९) – ३३ अर्थसहाय्य खाली रु.१०४००.०० लाख वितरणासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने ६०% म्हणजेच रु. ६३४०.०० लाख एवढ्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. याचा संकेतांक २०२११००८१११८२३२३०२ असा आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा