कृषी बातम्यायोजना

मोठी बातमी, केंद्र सरकारकने दिली “या” योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची मंजुरी..

The big news is that the central government has sanctioned crores of rupees for this scheme.

केंद्र सरकार शेतीच्या व जोड धंद्यांच्या/ व्यवसायांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते. यासाठी वेळोवेळी विविध योजना देखील राबविण्यात येतात. देशातील मत्स्यपालनाचे क्षेत्र सुधारण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने २०२०-२१ या वर्षात ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ (PMMSY) सुरू केली.

वाचा –हवामान खात्याचा इशारा, राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचं सावट; या 5 जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट..

मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे,मत्स्यव्यवसाय क्षेत्रासंबंधित कामांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे,मत्स्यपालनाची संभाव्यता वाढवणे आणि कृषी जीव्हीए व निर्यातीत योगदान वाढविणे अश्या प्रकारची उद्दिष्टे समोर ठेऊन सरकारने PMMSY योजना सुरू केली आहे.

‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत असणार आहे. मासे उत्पादक संघटना(FFPO), जोड व्यवसाय करणारे शेतकरी, मासे कामगार व मासे विक्रेते, राज्य मत्स्यव्यवसाय विकास मंडळे ( SFDB) ,उद्योजग व खाजगी कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेसाठी केंद्र सरकारने (central goverment) 20,050 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. (Fund) भारतीय मत्स्यव्यवसायात नीलक्रांती (Blue revolution) घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने देशातील सात केंद्रशासित प्रदेशात ही योजना सुरू केली असून ही मत्स्यक्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक (investment) आहे.

हे ही वाचा –

बँक ऑफ इंडियाने सुरू केली ही योजना; शेतकऱ्यांना मिळणार 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज…

शेतकरी मित्रांनो; या वनस्पतीची लागवड करून तुम्ही सहज 3.5 लाख कमवू शकता, ते कसे जाणून घ्या सविस्तर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button