मोठी बातमी, अनुदानित हरभरा बियाणांचा लाभ मिळणार; शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी 38 कोटी अनुदानाचा निर्णय..
शेतकर्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनुदानित हरभरा बियाणांचा लाभ घेऊन शेतकरी उत्पादनात वाढ करू शकतात. कृषी विभागातर्फे १८ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
हरभरा पिकासाठी एवढे अनुदान मिळणार –
कृषि विभागामार्फत हरभरा प्रमाणित बियाणे वितरणासाठी प्रति क्विंटल अडीच हजार रुपये अनुदान देण्यात येणार. हरभरा पिकासाठी रब्बी हंगामात एकूण ३८ कोटी अनुदानाचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. रब्बी हंगामामध्ये पेरणी होणाऱ्या एकूण क्षेत्रामध्ये हरभरा पिकाचे क्षेत्र अंदाजे ५० टक्के आहे. हरभरा पिकाचे पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, ‘RVG २०२’ व ‘BDNGK ७९८’ या वाणांचे एकूण एक लाख ९७ हजार क्विंटल हरभरा बियाण्याचे वितरण करण्यात येणार आहे. यापैकी २३ हजार क्विंटल प्रात्यक्षिकासाठी लागणारे बियाणे शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार आहे.
वाचा –
देय –
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत एक एकर मर्यादेत लाभ देण्यात येईल. सदर योजनेचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी हरभऱ्याची उत्पादन व उत्पादकता वाढवावी.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा