कृषी सल्ला

मोठी बातमी, रेशनकार्ड आता ऑनलाईन पाहायला मिळणार; पहा संपूर्ण प्रक्रिया…

शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेशनकार्ड ऑनलाईन पाहता येणार आहे. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर-नाव-पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसेच कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतं आणि ते किती मिळायला हवं? याची माहिती दिलेली असते. त्यामुळे ऑनलाईन पडताळणी करणे गरजेचे आहे. रेशन कार्ड म्हणजेच आरसी नंबर कसा शोधायचा व रेशन कार्ड ऑनलाईन कसे पहायचे? या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत..

वाचा –

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?

1) रेशन कार्ड नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.
2) त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
3) या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन सेवा या रकान्यात सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील मराठी या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला मराठीत माहिती दिसून येईल.


4) त्यानंतर वरच्या बाजूच्या साईन इन किंवा रेजिस्टर या रकान्यातील ऑफिस लॉग इन किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्यायांपैकी तुम्हाला सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
5) त्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत.इथं तुम्ही भाषा इंग्लिश ठेवू शकता किंवा लोकल लँग्वेज या पर्यायावर क्लिक करून मराठीत पुढे चालू ठेऊ शकता.
त्यानंतर खाली तुम्हाला दोन पर्याय असतील, एक म्हणजे नोंदणीकृत युझर आणि दुसरा नवीन युझर. तर आपण पहिल्यांदाच या साईटवर येत असल्यानं आपल्याला नवीन युझर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

6) त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं Do you have ration card आणि No ration card असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील.
7) यातल्या No ration card या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं सुरुवातीला तुम्हाला तुमचं स्थानिक भाषेतलं नाव, ते तुम्ही मराठीत लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालेल. त्यानंतर आधारवर जे नाव आहे आणि ते जसं आहे तसंच लिहायचं आहे. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुढे मेल आयडी असेल तर तो लिहायचा आहे, त्यानंतर आधार कार्डवरील जन्मतारीख टाकायची आहे. नंतर लिंग निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे.
8) ही माहिती भरून झाली की Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

वाचा –

तुम्ही जर मोबाईल वर हे पाहत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यात वरती लाल अक्षरात एक मेसेज दिसेल. पण जर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा पीसीवरती हे पाहत असाल तर Verify Aadhar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन झूमचं प्रमाण 100 किंवा त्याहून कमी टक्क्यांवर आणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लाल अक्षरातला मेसेज स्पष्टपणे दिसेल. याचा अर्थ तुमचं आधार कार्ड रेशन कार्डला ऑलरेडी लिंक केलेलं आहे. पुढे तुमचा जिल्हा, गावाचं नाव आणि आरसी आयडी म्हणजे बारा अंकी रेशन कार्ड नंबर दिलेला असेल.

रेशन कार्ड ऑनलाईन कसं पाहायचं?

1) आता एकदा का तुम्हाला तुमचा आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचं रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता.
त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.
2) त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
3) त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता आपण ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकला की समोरील view report वर क्लिक करायचं आहे.
4) त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल.

5) स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की, सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे.
6) यावर क्लिक केलं की तुमचं रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर-नाव-पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसंच तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतं आणि ते किती मिळायला हवं, याची माहिती दिलेली असते.
7) आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे रेशन कार्ड तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा इतर कामासाठी वापरू शकत नाही. तशी स्पष्ट सूचनाच इथं दिलेली आहे. ही सुविधा तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन बघता यावं, केवळ यासाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button