योजना

मोठी बातमी, “या” कामगारांसाठी “इ-श्रम” कार्ड योजना उपलब्ध; काय आहे ही योजना? जाणून घ्या सविस्तर..

केंद्र सरकार (Central Government) संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नवनवीन योजना नेहमी सुरू करत असते. बरेच पात्र असलेले कामगार काही कारणांमुळे लाभ घेऊ शकत नाहीत. या समस्यांवर उपाय केंद्र सरकारने (Central Government) काढला आहे. सर्व योजनांचा लाभ कामगारांना मिळण्यासाठी इ-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ही सरकारी योजना (Government scheme) ई-श्रम पोर्टल काय आहे? तुम्ही त्याचा लाभ कसा घेऊ शकता? याची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.

ई-श्रम योजना काय आहे?

या योजनेचा फायदा असा आहे की कोविड -१९ सारख्या किंवा दुसऱ्या कोणत्याही संकटावेळी DBT द्वारे थेट बँक खात्यांमध्ये कामगारांपर्यंत आर्थिक (Financial) मदत पोहोचते. तसेच ई-श्रम (E-labor) हे एक सरकारी पोर्टल आहे ज्यावर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा डेटा नोंदणीकृत आहे. यामध्ये सरकार (Government) कामगारांचा डेटा तयार करते व योजनांचे फायदे थेट लोकांपर्यंत पोहचवले जातात.

ई-श्रम पोर्टलचे फायदे काय आहेत?

तुम्हाला ई-श्रम कार्ड (E-labor card) बनवले असेल आणि तुम्ही काम शिकला नसाल तर सरकार तुमच्यासाठी प्रशिक्षणाचीही व्यवस्था करते. या योजनेतून सहज काम शिकू शकता आणि रोजगार मिळवू शकता. याच बरोबर ई-श्रम कार्ड (E-labor card) बनवून सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ तसेच असंघटित क्षेत्रासाठी सरकारने राबवलेल्या योजनांचा थेट लाभ मिळतो.

ई-श्रमचा लाभ कोणाला मिळेल?

हा फक्त असंघटित (Unorganized) क्षेत्रातील लोकांना दिला जातो. उदा. जे स्वतःचा छोटा व्यवसाय करत आहेत, जसे की मजूर, ई-रिक्षा चालक, रस्त्यावरील विक्रेते, हातगाडी, थाडी, फुटपाथवरील दुकाने, साफसफाई, नळांची दुरुस्ती किंवा विद्युत काम करणाऱ्या लोकांना इ श्रम योजनेचा लाभ दिला जातो.

वाचा –

इ श्रम कार्ड असे बनवले जाईल

1) सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://eshram.gov.in/

2) सेल्फ रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.

3) यानंतर, तुम्हाला आधारशी जोडलेल्या क्रमांकासह OTP द्वारे लॉगिन करावे लागेल.

4) त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक भरावा लागेल, तसेच OTP द्वारे प्रक्रिया पुढे जावी लागेल.

5) आता तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल, जी तुम्हाला ती स्वीकारावी लागेल.

6) लक्षात ठेवा की यामध्ये अनेक फॉर्म असतील, जे भरावे लागतील, तसेच तुमची माहिती द्यावी लागेल.

अशा प्रकारे तुमचे कार्ड बनवले जाईल. या व्यतिरिक्त, तुम्ही CSC ला भेट देऊन बनवलेले कार्ड देखील मिळवू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button