कृषी सल्ला

मोठी बातमी, राज्यातील बंद असलेले 40 कारखाने सुरू होणार; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा वाचा सविस्तर माहिती…

राज्य सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात या गाळप हंगामात उसाचे क्षेत्र जास्त झाल्यामुळे बंद असलेल्या साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये म्हणून राज्यातील बंद असलेले 40 साखर कारखाने तातडीने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

वाचा –

या महिन्यात साखर कारखाने सुरू होतील, काही कारखाने तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निमित्ताने सुरु झाले असल्याची माहिती आहे. यावर्षी जवळपास दोन लाख मेट्रिक टनाचे अधिक उत्पादन झाले आहे आणि तितकीच उसाची लागवड महाराष्ट्र मध्ये झालीय. त्यामुळे या उस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे 100 टक्के गाळप व्हायला पाहिजे असा चंग महाविकास आघाडीने, सहकार खात्यानं बांधला होता.

वाचा –

महाराष्ट्र मध्ये बंद पडलेले साखर कारखाने लवकरात लवकर सुरु कसे होतील यावर बैठक घेऊन यंदा बंद पडलेले साखर कारखाने विक्रमी आकड्यात सुरु केलेत. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे 100 टक्के गाळप होईल आणि उसाला हे सगळे कारखाने योग्य दर देतील याची जबाबदारी सहकार खात्याच्या माध्यमातून आम्ही घेऊ असा विश्वासही बोलून दाखवला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button