मोठी बातमी, डायनोसरची “या” ठिकाणी सापडली 100 अंडी; पुन्हा पृथ्वीवर राज्य करण्याची शक्यता..
अर्जेंटिना (Argentina) या लॅटिन (Latin) अमेरिकन (American) देशात 100 हून अधिक डायनासोरची अंडी सापडली आहेत. अर्जेंटिनातील डायनासोरच्या स्मशानभूमीत ही प्राचीन अंडी सापडली. ह्या अंड्यांमुळं आता जगात प्रथमच डायनासोरच्या (dinosaurs) कळपाविषयी चर्चा चालू आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
या अंड्यांच्या स्कॅनिंगनंतर ही सर्व डायनासोरच्या (dinosaurs) एकाच प्रजातीचे असल्याचे आढळून आलेय. या प्रजातीचं नाव Mussaurus patagonicus असं होतं. हे लांब मानेचे डायनासोर शाकाहारी होते. या डायनासोरचे घरटे 19.30 दशलक्ष वर्षे जुने असून त्यात 100 हून अधिक अंडी असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाचा –
80 सांगाड्यांसह 100 पेक्षा अधिक अंडी सापडली
या अंड्यांच्या मदतीनं आता जीवाश्मशास्त्रज्ञांना सुरुवातीच्या डायनासोरच्या प्रजातींची माहिती मिळू शकणार आहे. ही कोंबडीच्या आकाराची अंडी 8 ते 30 च्या गटातील आहेत, ज्यावरून असं सूचित होतं की ते घरट्यांमध्ये राहत होते. हे त्यांच्या पिलांचं सामान्य ठिकाण होतं. शास्त्रज्ञांना डायनासोरचे सांगाडेही सापडले आहेत. या सर्व पुराव्यावरुन स्पष्ट होतं की, डायनासोर कळपांमध्ये राहत होतं. संशोधक डिआगो पोल म्हणाले, मी या ठिकाणी डायनासोरचे सांगाडे शोधण्यासाठी गेलो होतो. आम्हाला तिथं 80 सांगाडे आणि 100 पेक्षा जास्त अंडी सापडली आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –