कृषी सल्ला

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; “या” नियमानुसार शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा..

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व बँकेच्या नवीन नियमानुसार आता शेतकऱ्यांना पीक कर्ज वा मध्यम व दीर्घ मुदतीच्या खर्चासाठी सिबील निकष लागू करण्यात आला आहे. कर्जाची परतफेड नियमित असण्यावर संबंधिताची पत ठरवली जात आहे. जे लोक नियमित कर्जफेड करीत आहेत त्यांनाच कर्ज मिळणार आहे. नियमित कर्जफेड केलेली हे सीबीलद्वारे कळणार आहे. ज्यांच्या सिबिल स्कोर 600 ते 700 पर्यंत असेल असे शेतकऱ्यांनाच बँका कर्ज वाटप करीत आहेत. या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया..

वाचा

बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर अगोदर ही कागदपत्रे गरजेची असायची..

1) जमिनीचा सातबारा,
2) 8अ चा उतारा,
3) पॅन कार्ड,
4) आधार कार्ड व सोबतच अन्य कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचा निल दाखला द्यावा लागत होता.

आता सीबील याची पडताळणी बंधनकारक आहे –

परंतु आता यासोबतच यामध्ये बदल करून आता सिबिल याची पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. बँका आता संबंधाचे पत ऑनलाईन पद्धतीने शिबिराच्या माध्यमातून ठरवत आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेने चार कंपन्यांसोबत करार केला असून या कंपन्यांच्या माध्यमातून कर्जदारांची पत पडताळली जात आहे.

वाचा

नियमित कर्जफेड करत आहात का? या संबंधित माहिती सीबीलद्वारे कळते..

शेतकरी असो वा एखादा नोकरदार यांनी कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा संबंधित व्यक्ती कोणाला जामीनदार असेल तर त्याचे संपूर्ण माहिती आता बँकांना सिबिलच्या माध्यमातून समजू लागले आहे. कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल व त्याचे हप्ते नियमित फरक पडत असतील तर तो शेतकरी कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतो. थकबाकी असल्याने कर्ज वाटप करता येत नाही. एखादी व्यक्ती कोणत्या बँकेचे थकबाकीदार आहे का किंवा ज्या व्यक्तीला जामीनदार आहे ती व्यक्ती नियमित कर्जफेड करत आहे का? यासंबंधीची माहिती या सिबिलच्या माध्यमातून कळते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button