ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

कृषी विभागाचे मोठे आवाहन; रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणं वाटपाचे जाहीर, ऑनलाइन अर्ज असा करा..

The big appeal of the Department of Agriculture; Announce the distribution of seeds on subsidy for rabbi season, apply online.

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या (Department of Agriculture, State Government) वतीने रब्बी हंगाम 2021-22 साठी गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची बियाणे (Crop seeds) अनुदानावर (Grants) मिळवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाकडे लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (National Food Security Campaign) अंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणं व पीक प्रात्याक्षिकासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन केले आहे.

अर्ज कसा व कुठे करायचा?

सर्व शेतकऱ्यांना (To all farmers) रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने (By the Department of Agriculture) गहू, हरभऱ्याचे बियाणे अनुदान वाटप करणार असल्याचे जाहीर केले. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर. याआधी भरण्यासाठी आवाहन केले आहे. सर्व शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर (Farmers on the MahaDBT portal) अर्ज करणे आवश्यक आहे. सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त अर्ज करून या अनुदानाचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन केले आहे. अर्ज करताना प्रमाणित बियाणे हा पर्याय निवडा. ज्या शेतकऱ्यांचं जमीन धारण क्षेत्र 2 हेक्टर पेक्षा कमी आहे. ते शेतकरी अर्ज करु शकतात. https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी कृषी विभागाने सांगितले आहे.

वाचा उच्च न्यायालय चा निर्णय: विवाहित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा म्हणता येणार नाही; वाचा सविस्तर निर्णय..

पीक पाहणी नोंदीसाठी आवाहन –

“माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा” या घोषवाक्याच्या आधारे शासनाने पीक पाहणी करण्यासाठी 15 ऑगस्टला सुरू केली होती. यावर्षी अँप सुरू केले आहे त्यापैकी बऱ्याच तसेच काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या आहेत तर काही भागांमध्ये पीक पाहणी अँप (Crop Survey app) चे अजूनही जनजागृती करावी लागत आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या अँप मधून महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी (E-Crop Survey) हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहेत.

वाचा केंद्राचा मोठा निर्णय; मोहरी, मसूर, गहू सहित सर्व रब्बी पिकांच्या “किमान आधारभूत किमती जाहीर”, 400 रुपयांनी वाढवल्या किमती..

इ पीक नोंदणीसाठी शेवटचे 7 दिवस –

15 सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी अ‌ॅपमधून नोंदणीची मुदत करण्यासाठी वेळ आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला (Crop registration) फक्त 7 दिवस शिल्लक राहिले आहेत. ई पीक पाहणी अ‌ॅपद्वारे नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत दिली होती.

वाचा आधारकार्ड वरील नाव व जन्मतारीख बदलू शकता आता मोबाईलवर; पहा प्रोसेस काय आहेत?

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सातबारा उतारा. ८ अ चा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबूक ही कागदपत्रं अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, संग्राम कक्ष, सेतू केंद्र किंवा मोबाईल वरुन अर्ज दाखल करता येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button