ताज्या बातम्या

Bank | राज्यातील ‘या’ बँकेला दोन दिवसात लागणार टाळं , शेतकऱ्यांनो तात्काळ काढून घ्या तुमचे पैसे

Banking | आता देशातील आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेला लवकरच टाळं लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) पुण्यातील रुपी सहकारी बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २२ सप्टेंबरपासून या बँकेच्या सर्व सेवा बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांनी त्यांचे पैसे बँकेतून काढावेत, अशी सूचना आरबीआयनं केली आहे. २२ सप्टेंबरनंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यानं रुपी सहकारी बँक आता बंद होणार आहे.आरबीआयनं पुणेस्थित रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे बँक आपले सर्व व्यवहार २२ सप्टेंबरपासून बंद करेल. त्यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेच्या ग्राहकांकडे केवळ २ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यानंतर ग्राहकांना त्यांचे पैसे खात्यातून काढता येणार नाहीत. रुपी बँकेची आर्थिक स्थिती ही अतिशय वाईट असल्यानं आरबीआय बँकेनं त्यांचा परवाना आता रद्द केला.

वाचा: शेतकऱ्यांनो ‘या’ योजनेंतर्गत बियाण्यांसाठी मिळतंय अनुदान, जाणून घ्या किती मिळतंय अनुदान

का केला आरबीआय बँकेने परवाना रद्द?

रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेनं आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच बँकेकडे पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्यानं आणि उत्पन्नाची शक्यता नसल्यानं आरबीआयकडून कारवाई करण्यात आली. याची माहिती आरबीआयनं ऑगस्टमध्ये ग्राहकांना दिली होती. १० ऑगस्टला यासंदर्भात एक प्रेस देखील रिलीज करण्यात आली होती. रुपी सहकारी बँकेचा परवाना हा ६ आठवड्यांनंतर रद्द करण्यात येईल. त्यानंतर बँकेच्या सगळ्या शाखा बंद होतील आणि ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत, असा आदेश आरबीआयनं काढला होता. आरबीआयनं आदेशात नमूद केलेला ६ आठवड्यांचा कालावधी आता २२ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरनंतर बँकेचं कामकाज हे बंद होईल.

वाचा: बाप रे! 17 महिने मृतदेहासोबत राहिले कुटुंबीय; जिवंत समजून मृतदेहावर खर्च केले 30 लाख अन् सत्य समजताचं…

ग्राहकांचे पैसे बुडणार?

रुपी सहकारी बँकेच्या ग्राहकांना आता पाच लाखांपर्यंतच्या रकमेसाठी विम्याचा लाभ मिळेल. तसेच डिपॉझिट अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशनकडून (डीआयसीजीसी) हा विमा मिळत आहे. डीआयसीजीसी ही आरबीआयची सब्सिडरी आहे. ग्राहकाची ५ लाखांपर्यंतची रक्कम ही रुपी बँकेत असल्यास त्याला पूर्ण क्लेम मिळेल. मात्र ५ लाखांपेक्षा अधिक रक्कम खात्यात असल्यास ग्राहकाला पूर्ण रक्कम मिळणार नाही. त्याला केवळ ५ लाख इतकीच भरपाई म्हणून मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Now this bank in the state will have to pay in two days; Withdraw your money, customers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button