कृषी तंत्रज्ञान

थायलंडमध्ये विकसित ‘4G बुलेट सुपर नेपियर’ या चारा पिकाची‌ प्रथमच लागवड; चार लाखांचा निव्वळ नफा…

सोमेश्वर लवांडे राहणार नेवासा तालुक्यातील फत्तेपुर गावातील या युवा शेतकऱ्याचे प्रयोगाला अखेर यश मिळालं आहे. थायलंडमध्ये विकसित केलेल्या फोर-जी सुपर नेपियर जातीच्या चाऱ्याची लागवड केली. कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दूधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हेच पीक आपल्याकडील पारंपरिक गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल, हे लक्षात घेत तीन वर्षांपासून केलेल्या प्रयोगानंतर यश मिळवले.

शेवटी कष्ट आणि जिद्द च फळ…

अनेक अडथळे, नुकसान सोसल्यानंतर लवांडे यांचा हा चारा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला आहे आणि त्यांनी लॉकडाऊनच्या काळात लाखो रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.

लॉकडाऊनमध्ये 15 लाखांची उलाढाल चारा

मध्ये झाली आहे आणि चार लाखांचा निव्वळ नफा केवळ 15 गुंठ्यात मिळवला.

चारा शेतीला उद्योगाची जोड देत फोर-जी बुलेट सुपर नेपियर, दशरथ, जीबी नंबर वन यासह दहा जातीच्या घास बियाणांची उत्पादकता लवांडे यांनी केली आहे.

वैशिष्ट्ये

सर्वात जास्त प्रथिने – 15 ते 18% प्रोटीनची मात्रा

मुरघास (सायलेज) स्पेशलिस्ट

एका वर्षाला 4 ते 5 कापण्या

5 ते 6 वर्षे चालणारी एकदम जलद वाढ

दुधारु जनावरांसाठी वरदान

खुराकावर खर्चाची बचत

18 ते 20 फुटापर्यंत उंची

WEB TITLE: The 4G Bullet Super Napier fodder crop developed for the first time in Thailand; Net profit of Rs 4 lakh …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button