10 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांचा खात्यात लवकरच जमा होणार, यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा..
The 10th installment will be credited to the farmer's account soon. Is your name on the list? Check it out ..
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या वर्षी मोदी सरकारने (government) मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत पैसे (money) ट्रान्सफर केले होते. आता 15 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांचा 10 वा हप्ता खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे. तर या यादीत तुमचे नाव आहे का तपासा.
वाचा –
यादीत नाव असे तपासा –
1) सर्वप्रथमच https://pmkisan.gov.in ही वेबसाईट ओपन करा.
2) होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
3) Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
4) नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. व त्यानंतर Get Report वर क्लिक करा.
5) नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, त्यात आपले नाव शोधा.
वाचा –
अशा प्रकारे तपासा हप्त्याचे स्टेटस
पीएम किसान (Kisan) वेबसाईट pmkisan.gov.in वर जा. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा. मग पुढे पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. मग तुम्हाला स्टेटस दिसेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –