इतर

भयंकर; कुत्रा माणसाला चावला म्हणून माणसाने कुत्र्याचा घेतला जोरदार चावा, दोघे एकाचवेळी हॉस्पिटलमध्ये भरती..

बिहारच्या गोपालगंजमध्ये राहणाऱ्या 26 वर्षांच्या मन्नू मांझी नावाच्या तरुणाने एक कुत्रा पाळला होता. त्याला कुत्र्यांची आवड असल्यामुळे लहानपणापासून तो कुत्रा पाळत होता. या कुत्र्याने एक दिवस मन्नूचा करकचून चावा घेतला. कुत्र्याचे दात लागल्यामुळे जखमी झालेल्या मन्नूचा राग अनावर झाला. कुत्र्याला धडा शिकवायचं ठरवलं. तरुण कुत्र्याला चावला व त्याचा जोरदार चावा घेतला.

वाचा

मालक व कुत्रा दोघे हॉस्पिटलमध्ये भरती –

तरुणाचे दात लागल्यामुळे कुत्रादेखील जखमी झाला आणि विव्हळू लागला. रागाचा पारा थंड झाल्यानंतर तरुणाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो कुत्राला बाईकवर घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये आपल्या कुत्र्याला कडेवर घेऊन तो अस्वस्थपणे येरझारे घालू लागला. हॉस्पिटल प्रशासनाची तारांबळ कुत्र्याला लवकरात लवकर उपचार मिळावेत, यासाठी आग्रही असणाऱ्या तरुणाला हॉस्पिटलच्या स्टाफनं समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला डॉक्टरांनाच भेटण्याची इच्छा होती. अखेर डॉक्टरांनीच त्याची समजूत काढली.

वाचा –

तरुणाला रेबिजचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्याच्या जखमेवर मलमपट्टी करून आणि त्याला औषधं देऊन शांत केलं. कुत्र्याला प्राण्यांच्या दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. हा सल्ला पटल्यानंतर तरुणकुत्र्याला घेऊन प्राण्यांच्या हॉस्पिटलकडे रवाना झाला.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button