ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

इन्कम टॅक्स विभागाकडून करदात्यांना दिलासा, ITR भरण्यास मिळणार मुदत वाढ…

Taxpayers will get relief from Income Tax Department, extension of deadline for filing ITR ...

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (Central board of Direct taxes) ने आयकर विवरणपत्र (income tax return) भरण्याची मुदत वाढवली आहे. कर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२१ वरून ३० नोव्हेंबर २०२१ करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कर भरण्याची मुदत वाढ करून करदात्यांना दिलासा दिला आहे.

आयकर कायद्यानुसार ज्या लोकांचा खात्याची ऑडिट करणे (Auditing the account) आवश्यक नाही, आणि जी ITR फॉर्म1 आणि ITR फॉर्म 4 च्या माध्यमातून कर भरतात. ज्या कंपन्यांचे ऑडीट होते त्यांची मुदत ३१ ऑक्टोबर केली आहे.

इन्कम टॅक्स ऑडिट (income tax audit) ची अंतिम तारीख ३१ऑक्टोबर २०२१ पासून वाढवून ३० नोव्हेंबर २०२१ करण्यात आली आहे.
टॅक्स ऑडिट रिपोर्ट फायनल करण्याची (To finalize the tax audit report) अंतिम तारीख 30 सप्टेंबर २०२१ वाढवून ३१ऑक्टोबर २०२१ केली आहे. बिलेटेड / सुधारित आयकर (belated tax) विवरणपत्र भरण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे. ही मुदतवाढ ३१ डिसेंबर २०२१ वाढवून ३१ जानेवारी २०२२ करण्यात आली.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यासाठी मुदत संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न भरले जाते. बिलेटेड कर भरणाऱ्यांना दंड भरावा (Billed taxpayers should be fined) लागतो. सुधारित आयटीआर दाखल करताना करदाता मूळ कर परतावा करताना काही त्रुटी आढळल्यास तो सुधारित करू शकतो.

करदात्यांना एक महत्वाची अशी ही बातमी आहे, इन्कम टॅक्स फिलींग करताना करदात्याला आता जास्त दिवस मुदत मिळणार आहे. या काळात (pandemic) अनेक कंपन्या, नोकरदार , व्यवसायिक यांची आर्थिक बाजूही कमकुवत झालेली आहे, त्यामुळे सरकारकडून ही मुदतवाढ मिळावी ही चांगली गोष्ट आहे.

हे ही वाचा:

केंद्र सरकारचा मोठा निर्णय: खतांच्या किंमतीच्या अनुदानात (Subsidy) मोठा बदल!

मोदी सरकारच्या,’ या’ स्कीम मधून मिळावा 2 लाख रुपयांचा फायदा! घ्या सविस्तरपणे जाणून…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button