कृषी तंत्रज्ञान

टाटा स्टीलने लॉन्च केले स्मार्ट सोल्युशन; कांद्यासाठी ठरतंय अत्यंत उपयोगी, काय आहे हे नवीन तंत्रज्ञान? पहा या विषयी सविस्तर माहिती..

महाराष्ट्र मध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कांदा हा जास्त काळ टिकणारा नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कांद्याची साठवणूक तंत्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे असते. कांद्याचे बाजार भाव नेहमी कमी जास्त होत असतात. त्यामुळे साठवणूक करून योग्य दरात कांद्याची विक्री करता येते. या सर्वांचा विचार करून टाटा स्टीलने एक सोल्युशन विकसित केले आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होणार-

कांदा साठवणुकीसाठी योग्य यंत्रणा नसल्यामुळे बऱ्याच प्रमाणात कांदा खराब होतो. शेतकऱ्यांच्या समस्या वर उपाय शोधत टाटा स्टीलच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्युशन ब्रांड नेस्ट ने देशातील पहिले कांदा साठवणुकीसाठी एक सोल्युशन ऍग्रो नेस्ट लॉन्च केले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीत होणार असून यामुळे बऱ्याच प्रमाणात कांदा व्यवस्थित ठेवता येणार आहे. या तंत्रज्ञानामध्ये विज्ञान, नवीन अद्यावत इनोवेशन चा वापर केला गेला आहे.

वाचा

शेतकर्‍यांनी कांदा साठवणूक करण्याच्या पद्धतीत बर्‍याच अडचणी असतात. साठवणुकीच्या राखण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा 40% कांदा चाळीत खराब होतो. शेतकऱ्यांच्या ही समस्या लक्षात घेता टाटा स्टीलच्या नेस्ट इन आणि इनोव्हेटर टीमने एक स्मार्ट वेअर हाऊस म्हणजे गोदाम सोलुशन ॲग्रोनेस्ट विकसित केले आहे.

वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button