आरोग्य

WHO|:टॅल्कम पावडरमुळे कर्करोगाचा धोका|

WHO| मुंबई, 6 जुलै 2024: जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कर्करोग संशोधन एजन्सीने (IARC) शुक्रवारी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार, टॅल्कम पावडरमुळे व्यक्तीला कर्करोग होऊ शकतो.

गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंध:

काही आठवड्यांपूर्वीचं संशोधन दर्शविलं होतं की, टॅल्कम पावडर आणि गर्भाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer) यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. याआधी IARC ने म्हटलं होतं की, टॅल्कम पावडरमुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो याबद्दलचा निर्णय मर्यादित पुराव्यांच्या आधारावर घेण्यात आला होता. पण उंदरांवर केलेल्या संशोधनानंतर पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर टॅल्कम पावडरमुळे व्यक्तीमध्ये कर्करोगाची शक्यता निर्माण (create) होते असे समोर आले.

वाचा:True Friend| खरे मित्र आणि बनावट मित्र: फरक कसा ओळखावा

महिलांमध्ये धोका:

कॅन्सर एजन्सीने म्हटले आहे की, अनेक अभ्यासातून समोर आले आहे की, बहुतांश महिला प्रायव्हेट पार्टसाठी टॅल्कम पावडरचा वापर करतात. यामुळेच महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची वाढ होते. दरम्यान, द लॅसेंट ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, टॅल्कसाठी एक कारणात्मक भूमिका (role) पूर्णपणे स्थापित केली जाऊ शकत नाही.

टॅल्कबद्दल तथ्ये:

  • IARC ने म्हटले की, बहुतांशजण टॅल्कम पावडर बेबी पावडर अथवा कॉस्मेटिकच्या रुपात वापरतात. पण टॅल्कबद्दल अधिक जाणून घेतल्यास कळते की, त्याचे उत्खनन केल्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. अथवा प्रोडक्ट्स म्हणून वापरण्यासाठी तयार केले जाते.
  • टॅल्क हे नैसर्गिकरित्या आढळणारे खनिज असून ज्याचे जगभरात उत्खनन (Excavation) केले जाते. याचा वारंवार वापर टॅल्कम बेबी पावडर तयार करण्यासाठी केला जातो.

विवाद:

AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, युके ओपन युनिव्हर्सिटीतील सांख्यिकीशास्रज्ञ केविन कॅककॉनवे यांनी म्हटले की, IARC ने केलेल्या संशोधनात आमचा सहभाग नव्हता. याशिवाय कॅककॉनवे यांनी म्हटले की, IARC ने स्पष्टपणे केलेले दावे दिशाभूल करणारे असू शकतात.कॅककॉनवे यांनी पुढे म्हटले की, अभ्यास निरिक्षणात्मक असल्याने टॅल्कमच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका वाढला जातो हे सिद्ध झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button